फेस्टिव्ह सीझन नंतर लगेच वेडिंग सिझन येतो. हा वेडिंग सिझन फेस्टिव्ह सीझन इतकाच महत्वाचा असतो. या खास प्रसंगी आपण प्रेसेंझेटेबल आणि स्टायलिश असणं खूप महत्वाच आहे. अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण कुटूंब एकत्र येतात. या कार्यक्रमात डार्क, रंगीत पारंपरिक असे कपडे जास्त शोभून दिसतात. जर तुमचा लूक सिम्पल असेल तर तुम्ही इतरांपेक्षा कमी आकर्षक दिसाल. अशा प्रसंगी बऱ्याचदा लोक रंगीत, पारंपरिक, स्टायलिश, ट्रेंडी अशा कपड्यांची निवड करतात.
लग्नाला सिम्पल लूक टाळण्याचे मुख्य कारण म्हणजे लग्न हा एक आनंदाचा आणि उत्साहाचा प्रसंग असतो. यामध्ये आपला सिम्पल लूक उठून दिसणार नाही. पारंपरिक किंवा मॉडर्न पोशाख अधिक उठून दिसतात. सिम्पल लूकमुळे आपण थोडे अंडरड्रेस्ड किंवा खूप सिम्पल वाटू. त्यामुळे लग्नाला अधिक स्टायलिश, ट्रेंडी आणि ट्रेडिशनल अशा कपड्यांची निवड करू शकता. तुम्ही अशा प्रकारे वेडिंग सिझनला तुमचा सिम्पल लूक हटके करू शकता.
फ्युजन आउटफिट
तुम्ही तुमच्या सिम्पल आउटफिटला वेस्टर्न आणि फ्युजन टच देऊ शकता. पारंपरिक कपड्यांना वेस्टर्न टच दिल्यामुळे तुमचा लूक मॉडर्न आणि सुंदर दिसेल.
फंकी ज्वेलरी
साध्या आउटफिटला हटके लूक देण्यासाठी तुम्ही मोठी किंवा ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी ट्राय करू शकता.
हेअर स्टाइलिंग
तुमच्या हेअर स्टाइलमुळे देखील सिम्पल लूक हटके दिसू शकतो. जसे की बन, ब्रेड किंवा साइड टाय हेअरस्टाइल खूप सुंदर दिसेल.
कॉन्ट्रास्ट कलर
सिम्पल ड्रेसला कलर कॉन्ट्रास्ट करू शकता. एकदम सिम्पल आउटफिट घ्या आणि त्यावर कॉन्ट्रास्ट कलरचा दुपट्टा, जॅकेट किंवा ब्लाउज स्टाइल करा.
कपड्यांचा फॅब्रिक
कपड्यांचा फॅब्रिक देखील अत्यंत महत्वाचा भाग आहे. तुम्ही सिल्क, बनारसी, शिफॉन यांसारख्या फॅब्रिकमध्ये सिम्पल आणि रॉयल लूक मिळेल.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सिम्पल आऊटफिटला हटके स्टाइलिश आणि रॉयल लूक देऊ शकता.
हेही वाचा : Wedding Fashion : लग्नाच्या सिझनसाठी तरुणींकरता हे आउटफिट उत्तम
Edited By : Prachi Manjrekar