Monday, January 13, 2025
HomeमानिनीHealthHealth-Ayurveda आयुर्वेदाच्या साहाय्याने वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

Health-Ayurveda आयुर्वेदाच्या साहाय्याने वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

Subscribe

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे. त्यातच हिवाळा अनेक आजार घेऊन येतो. यामुळे यादिवसात व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, खोकला किंवा सध्या चर्चेत असलेला एचएमपीव्ही (ह्युमन मेटाप्युमोव्हायरस) या रोगांचा धोकाही वाढला आहे. पण जर तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल तर कोणत्याही आजारावर तुम्ही सहज मात मिळवू शकता. त्यासाठी काही आयुर्वेदीक वनस्पती उपयुक्त आहेत.

आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की, हल्लीच्या डिजिटलच्या जमान्यात नोकरी करणाऱ्यांचा बराचसा वेळ हा कॉम्प्युटर, लॅपटॉपवर काम करण्यात जातो. त्यामुळे शरीराची हालचाल मंदावते. परिणामी अन्नपचन व्यवस्थित होत नाही. पचनशक्ती मंदावते. त्यातूनच मग अनेक आजार उद्भवातत. उदा. बद्दकोष्ठ, मधुमेह, स्थूलता, बीपी यासारख्या व्याधी मागे लागतात. अशावेळी जर तुम्ही दररोज रात्री झोपतेवेळी आवळा, तुळशी आणि पिंपळीचे चूर्ण कोमट दूधासोबत घेतले तर फायदेशीर ठरते. त्यामुळे पचनसंस्थेलाही फायदा होतो.

- Advertisement -

तसेच हे चूर्ण श्वसनाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते.

तणाव

- Advertisement -

तज्ज्ञांच्या मते रोजची धावपळ आणि कामाचा ताण यामुळे प्रत्येक व्यक्तीची तणावाची पातळीही वाढत आहे. परिणामी लहानसहान गोष्टींवर रागावणे, चिडचिड करणे या समस्येने १० पैकी ८ जण त्रासले आहेत. हा ताण कमी करण्यासाठी अश्वगंधा आणि गिलॉय खूप फायदेशीर आहेत. यामुळे ज्या व्यक्तींना या सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो त्यांनी अश्वगंधा आणि गिलॉयचा जीवनशैलीत समावेश केल्यास तणाव दूर राहतो.

आयुर्वेदानुसार निरोगी जीवनशैलीसाठी तुमच्या दिनक्रमात प्राणायामचा समावेश करा. यासोबतच रोजची ७ ते ८ तासांची झोपही महत्त्वाची आहे.

यासोबतच आपल्या आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या आहारात हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. शक्यतो बाहेरच्या गोष्टी खाऊ नका. दररोज पुरेसे पाणी पिणे गरजेचे असल्याचेही तज्ज्ञ सांगतात. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

- Advertisment -

Manini