Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- केळी 3 मध्यम आकारचे
- मैदा
- 1 वाटी साखर
- 2 चमचे तूप
- 3 ते 4 चमचे बेकिंग पावडर
- 1 ते 2 चमचे बेकिंग सोडा
- 1 ते 4 चमचे दालचिनी पूड
- चिमूटभर मीठ
- 1 चमचा दूध
- चोकोचीप्स आवडीनुसार
Directions
- एका बाऊलमध्ये केळी सोलून चांगली मॅश करून घ्या.
- मॅश केल्यानंतर त्यामध्ये साखर आणि तूप घालून मिश्रण चांगलं एकत्र करून घ्या.
- दुसऱ्या बाउलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ आणि दालचिनी पूड एकत्र करून घ्या.
- आता या मैद्याच्या बाऊलमध्ये केळ्याचे तयार केलेलं मिश्रण घाला आणि एकत्र करा. जास्त फेटू देऊ नका.
- मिश्रण जास्त घट्ट झाले असतील तर यामध्ये थोडं दूध घालून मिक्स करून घ्या.
- तुम्ही या मफिनला साच्याने किंवा हाताने आकार देऊ शकता.
- आकार दिल्यावर यावर चोकोचीप्स घाला.
- ओव्हन 180 डिग्री वर 30-35 मिनिटं बेक करून घ्या.
- गरमागरम बनाना मफिन्स तयार आहे.