Wednesday, April 24, 2024
घरमानिनीBeautyBeauty products; ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या

Beauty products; ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

Subscribe

ऑनलाइन शॉपिंगमध्ये अनेक आकर्षक सवलती उपलब्ध आहेत आणि या सवलतीमुळे, आपल्याकडून अनेकदा चुका होतात, विशेषतः सौंदर्य उत्पादनांच्या खरेदीमध्ये. त्यामुळे ऑनलाइन सौंदर्य प्रॉडक्ट खरेदी करताना काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या व्यस्त जीवनशैलीत प्रत्येकाला धावपळ न करता घरी बसूनच वस्तू मिळवायच्या असतात. म्हणूनच लोकांना ऑनलाइन शॉपिंगची खूप आवड असते. ऑनलाइन शॉपिंगमध्ये त्यांना बाजारात जाण्याची गरज नसते, ते घरबसल्या आरामात ऑर्डर करू शकतात. इतकंच नाही तर अनेक आकर्षक सवलतीही ऑनलाइन उपलब्ध आहेत आणि या सवलतीमुळे आपल्याकडून अनेकदा चुका होतात, विशेषत: सौंदर्य उत्पादनांच्या खरेदीमध्ये. त्यामुळेच ऑनलाइन सौंदर्य प्रॉडक्ट खरेदी करताना काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

 

- Advertisement -

खरेदी करण्यापूर्वी रिटर्न पॉलिसी जाणून घ्या

अनेकदा आपण ऑफर पाहिल्यानंतर उत्पादनाच्या रिटर्न पॉलिसीकडे लक्ष देत नाही आणि ऑर्डर देतो आणि ती मिळाल्यानंतर काही कारणास्तव साइटद्वारे रिटर्न स्वीकारला जात नाही. नंतर आपलीच चूक होते. पश्चात्ताप होतो, म्हणूनच असे ऑर्डर देण्यापूर्वी रिटर्न पॉलिसी वाचणे खूप महत्वाचे आहे. तसेच तुम्हाला प्रॉडक्ट मिळाल्यावर सील तपासा, तुम्हाला सीलमध्ये काही दोष दिसल्यास, ते घेऊ नका.

 

- Advertisement -

केवळ प्रतिष्ठित साइटवरून खरेदी करा 

ऑनलाइनच्या युगात, तुम्हाला अनेक साइट्स दिसतील ज्या प्रॉडक्ट देण्याचे वचन देतात, परंतु अशा अनेक साइट्स आहेत ज्या बनावट प्रॉडक्ट देखील विकतात. म्हणूनच तुम्हाला सौंदर्य उत्पादनांची ऑनलाइन खरेदी करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे, तसेच नेहमी जाणून घ्या केवळ प्रतिष्ठित साइटवरून खरेदी करा.

 

किंमतीची तुलना करा

ऑर्डर देण्यापूर्वी, ते उत्पादन इतर साइटवर किती उपलब्ध आहे, तसेच उत्पादनाची खरी किंमत काय आहे हे तपासा. जेव्हा तुम्ही ऑनलाइन सौंदर्य उत्पादने ऑर्डर करत असाल, तेव्हा नेहमी प्रथम एक ट्रायल पॅक ऑर्डर करा.

 

उत्पादन कालबाह्यता तपासणे आवश्यक आहे

सहसा ब्युटी प्रोडक्ट्सची एक्सपायरी 3 वर्षांची असते.अशा अनेक साइट्स देखील आहेत जेव्हा ते पाहतात की प्रोडक्टची एक्सपायरी जवळ आली आहे.  खरेदी करण्यापूर्वी एक्सपायरी जरूर तपासा.

 

हेही वाचा –  तुम्हाला Lipstick लावायला आवडतं… हे नक्की वाचा

- Advertisment -

Manini