Sunday, September 24, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Beauty Workout नंतर त्वचेची घ्या 'अशी' काळजी 'या' चुका करू नयेत

Workout नंतर त्वचेची घ्या ‘अशी’ काळजी ‘या’ चुका करू नयेत

Subscribe

स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण सगळेजण काही ना काही प्रयन्त करत असतो. पण आपल्या आरोग्यासोबतच आपल्या त्वचेकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकदा आपण तंदुरुस्त राहण्यासाठी वर्कआऊट करतो, पण त्यानंतर त्वचेची काळजी घेणे विसरतो किंवा त्यात काही चूक करतो.

अशामुळे आपली स्किन खराब होते. तसेच वर्कआऊटनंतर त्वचेची योग्य काळजी घेतली नाही, तर त्वचा फुटणे, त्वचेची जळजळ आणि अकाली त्वचा जास्त वय असल्या सारखी दिसणे असे अनेक परिणाम त्वचेवर लगेच झालेले दिसून येतात. तर, आता आपण त्वचेची काळजी वर्कआउटनंतर कशी घ्यायला हवी आणि कोणत्या चुका वर्कआउट केल्यानंतर टाळल्या पाहिजेत हे आपण जाणून घेऊया…

- Advertisement -

Post-Workout Skincare: Why Washing Your Face Is A MUST – SWEAT

1. चेहरा धुताना ही काळजी घ्या

वर्कआऊटनंतर त्वचा स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे. पण चेहरा साफ करताना गडबड केल्याने तुमच्या त्वचेला समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक वेळा आपण चेहरा साफ करत नाही, त्यामुळे घाम तुमच्या त्वचेवर असलेल्या घाण आणि बॅक्टेरियामध्ये मिसळतो. अशा स्थितीत त्वचेची छिद्र बंद होतात. आणि हे छिद्र बंद असल्यामुळे अनेकजण चेहरा अजून घासून धुतात. मात्र, असे केल्याने तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचेचा कोरडेपणा आणि जळजळपणा वाढू शकतो.

2. जास्त वेळ अंघोळ करू नये

- Advertisement -

वर्कआउट केल्यानंतर त्वचेच्या स्वच्छतेसाठी आंघोळ करणे फार महत्वाचे आहे. पण जर तुम्ही खूप जास्त वेळ अंघोळ केली तर घाम तुमच्या त्वचेवर बराच काळ टिकून राहतो आणि त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. एवढेच नाही तर शॉवर घेताना गरम पाण्याचा वापर टाळावा. जास्त गरम पाण्यामुळे त्वचा ड्राय होते. त्यामुळे स्किनला हानी पोहचते.

3. मॉइश्चरायझरचा वापर न करणे

त्वचा स्वच्छ केल्यानंतर, ते रीहायड्रेट करणे फार महत्वाचे आहे. पण कधी कधी आपण मॉइश्चरायझर लावायला विसरतो. आणि यामुळे स्किन डिहायड्रेड होते. जर तुम्ही वर्कआउटनंतर तुमची त्वचा स्वच्छ करत असला आणि मॉइश्चरायझर लावत नसाल तर त्वचा लगेच डल आणि निस्तेज दिसू लागते.

4. चेहऱ्याला जास्त मेकअप करू नका

वर्कआउट करताना जास्त मेकअप करू जाऊ नये. जास्त मेकअपमूळे घाम आणि मेकअप एकत्र होतो. जो तुमच्या त्वचेला अत्यंत हानिकारक आहे. मेकअपमध्ये असलेले हेवी पार्टिकल्स चेहऱ्याच्या नाजूक त्वचेला हानी पोहचवतात. ज्यामुळे नितळ त्वचा काळी पडते. चेहऱ्यावर बारीक फोड्या आणि चेहरा सारखा कोरडा पडणे या समस्या सतत उध्दभवू लागतात.

5. सनस्क्रीन लावणे फायदेशीर

जर तुम्ही वर्कआउट केल्यानंतर उन्हात जात असाल तर सनस्क्रीन लावणे फार महत्वाचे आहे . अनेक वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचे परिणाम आपल्या त्वचेला भोगावे लागतात. घामामुळे तुमची त्वचा सनबर्नसाठी अधिक संवेदनशील होऊ शकते. अशा परिस्थितीत तुमच्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी तुम्ही सनस्क्रीन लावावे.

___________________________________________________________________

हेही वाचा : हातांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी घरीच बनवा हॅन्ड स्क्रब

- Advertisment -

Manini