रोजच्या आहारात कांद्याचा आपण विविध प्रकारे उपयोग करत असतो. पण, कांद्याचे फायदे केवळ आरोग्यापुरते मर्यादित नाहीत. तर कांद्यापासून तेलही बनवता येते. जे केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. केस कमकुवत असो किंवा जास्त पातळ असो, कांद्याचे तेल आपला प्रभाव दाखवतो आणि केसांना घट्ट,आणि मजबूत बनवण्यास फायदेशीर ठरतो. कांद्याचे तेल हे एक आयुर्वेदिक तेल आहे. जे अँटिऑक्सिडंट्स आणि एन्झाईम्सने समृद्ध आहे आणि केसांसाठी जादुई तेल म्हणून देखील ओळखले जाते. हे तेल डोक्याला लावल्याने डोक्यातील कोंड्याची समस्या दूर होते, टाळूला पोषण मिळते. तसेच केस मुळापासून टोकापर्यंत निरोगी राहतात आणि वेगाने वाढू लागतात. अशातच आता आपण जाणून घेऊया कांद्याचे तेल घरी कसे बनवायचे….
साहित्य
कांद्याचे तेल बनवण्यासाठी तुम्हाला 200 मिली खोबरेल तेल, अर्धा चिरलेला कांदा आणि एक कप कढीपत्ता. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे तेल कढीपत्त्याशिवाय देखील बनवू शकता, परंतु कढीपत्ता घातल्यास कांद्याच्या तेलाचा प्रभाव अधिक वाढतो.
कृती
- सर्वप्रथम कांदा कापून ब्लेंडरमध्ये टाकून बारीक करून घ्या. त्यात कढीपत्ता घालून बारीक करून पेस्ट बनवा.
- आता गॅसवर तवा किंवा लहान भांड ठेवा आणि त्यात खोबरेल तेल गरम करून घ्या.
- हे तेल काही वेळ गरम केल्यानंतर त्यात कांदा आणि कढीपत्ता घालून तेल चांगले उकळून घ्या.
- हे तेल 5 ते 10 मिनिटे उकळ्यानंतर गॅस बंद करा.
- कांद्याचे तेल आता तयार आहे. हे तेल थंड करून गाळून एका भांड्यात ठेवा.
- हे तेल दररोज किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांना लावा.
- यानंतर हे तेल किमान एक ते दीड तास लावल्यानंतर केस धुवा.
कांद्याचे तेल लावण्याचे ‘हे’ आहेत फायदे
- कांद्यामध्ये असलेले एन्झाइम केसांच्या वाढीस मदत करतात.
- हे तेल लावल्याने नवीन केसही वाढू शकतात.
- हे तेल पातळ केस आणि कमकुवत केस तुटण्याच्या समस्येपासून रक्षण करतात.
- कांद्याच्या तेलाचा नियमित वापर केल्याने केस पांढरे होण्याची समस्या होत नाही.
- या तेलामुळे केस लवकर काळे पडत नाहीत.
- टाळूवर बॅक्टेरियाचे संक्रमण दूर ठेवण्यासाठी कांद्याचे तेल अतिशय उपयुक्त आहे.
- महत्वाचे म्हणजे कांद्याच्या तेलाने टाळूची पीएच पातळी संतुलित राहते. त्यामुळे केस जास्त प्रमाणात गळत नाहीत.
- या तेलाचा प्रभाव नैसर्गिक कंडिशनरसारखा दिसतो आणि त्यामुळे केस मऊ राहतात.
- केसांची पोत सुधारण्यासाठी कांद्याचे तेलही लावता येते.
- नियमित कांद्याच्या तेलाने मालीश केल्यास केसांना पोषक मिळते.
- तसेच बाहेरच्या दूषित वातावरणापासून केसांना संरक्षण मिळते.