Thursday, February 22, 2024
घरमानिनीBeautyBeauty : वयाच्या पंचविशीनंतर चेहऱ्याची 'अशी' घ्या काळजी

Beauty : वयाच्या पंचविशीनंतर चेहऱ्याची ‘अशी’ घ्या काळजी

Subscribe

प्रत्येकाला छान सुंदर आणि टापटीप राहायला आवडते. मात्र विशिष्ट वयानंतर त्वचेवर आणि शरीरावर अनेक प्रकारच्या खुणा आणि सुरकुत्या दिसणे स्वाभाविक आहे. त्याचबरोबर त्वचेची योग्य वेळीस काळजी घेतल्यास वयानंतरही त्वचा चांगली राहते. तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. तसेच जर का तुम्हाला तुमचा चेहरा तजेलदार ठेवायचा असेल तर तुम्ही वयाच्या 25 वर्षांनंतर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये या दोन गोष्टींचा समावेश करा.

जेणेंकरून त्वचेच्या कोणत्याच समस्या तुम्हाला होणार नाहीत. याचबरोबर जेव्हा तुम्ही रोजच्या रोज बाहेर फिरायला किंवा कामाला जात तेव्हा या दोन गोष्टी चेहऱ्याला लावा यामुळे चेहऱ्यावर डाग आणि सुरकुत्या पडणारा नाहो. तुमचा चेहरा कायमस्वरूपी फ्रेश आणि उठून दिसेल. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊया…

What NOT To Do In Your Skincare Routine
1. सनस्क्रीन लोशन

सनस्क्रीन लावणे नेहमीच गरजेचे आहे. कारण जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा सूर्यकिरणांमुळे शरीरावर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी अर्धा तास आधी चेहऱ्यावर तसेच हात आणि पायांवर क्रीम किंवा कोणतेही लोशन लावा. यामुळे त्वचेला हानी पोचणार नाही.

2. रेटिनॉल क्रीम किंवा सिरम वापरा क्रीम किंवा सिरम वापरा

जर का तुम्ही चेहऱ्याला कोणत्याच प्रकारचे लोशन किंवा कसलीच क्रेईम लावत नसाल तर चेहऱ्याला तुम्ही रेटिनॉल क्रीम किंवा सिरमचा वापर करू शकता. तसेच ही हे सिरम किंवा क्रीम लावण्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच रेटिनॉल क्रीम किंवा सिरम वापरण्यास सुरुवात करा. बऱ्याच जणांची स्किन ही संवेदनशील असते जी तुमच्या चेहऱ्याला आणि त्वचेला त्रास देऊ शकते. तसेच जर का तुम्हाला रेटिनॉल क्रीम किंवा सिरम लावायचे असेल तर त्या आधी चेहऱ्याला मॉश्चराइजर लावा. त्यामुळे साईड इफेक्ट्स लगेच होणार नाहीत.

- Advertisement -

अशाप्रकारे घ्या त्वचेची काळजी आणि या गोष्टी ठेवा लक्षात

  • जर तुम्हाला वयाची वाढती लक्षणे टाळायची असतील, तर तुमच्या दैनंदिन त्वचेच्या काळजीचे हे तीन टप्पे कधीही टाळू नका. ते म्हणजे क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग.
  • यासोबतच शरीराच्या गरजेनुसार पुरेसे पाणी प्या. त्यामुळे त्वचेला आतून ओलावा मिळेल.
  • त्वचा तरूण ठेवण्यासाठी कोलेजन नावाचे प्रथिन खूप महत्वाचे आहे. त्यामुळे ज्या पदार्थांमध्ये कॉलेजन आहे ते पदार्थ आहारात घ्यावेत.
  • यामुळे त्वचा दीर्घकाळ चांगली राहते. तसेच चेहऱ्याला प्रोटीन मिळते आणि चेहऱ्याला सुरकुत्या देखील पडत नाहीत.
  • तसेच चेहरा दिवसेंदिवस तरुण दिसण्यासाठी आहारात भरपूर पोषक मूल्य ठेवा.
  • यासोबतच दररोज व्यायाम किंवा योगा करा, कारण तरुण राहण्यासाठी निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे.

हेही वाचा : दमट वातावरणात ‘असे’ मेकअप करणे टाळावे

- Advertisment -

Manini