Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Beauty चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी लावा 'हा' फेस पॅक

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी लावा ‘हा’ फेस पॅक

Subscribe

आजच्या काळात त्वचेवरील तेज ठिकवून ठेवणे, फार अवघड झाले आहे. थोड्याशा निष्काळजीपणानेही त्वचेची चमक निघून जाऊ शकते. यामुळे परिणाम म्हणजे विशेषतः चेहऱ्यावर सुरकुत्या (Wrinkle) दिसू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नये म्हणून फेस पॅक (Face Pack) त्वचेसाठी फायदेशीर असतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी फेस पॅक बनवू शकता. यासंदर्भात ब्यूटी एक्सपर्ट शहनाज हुसैन यांनी घरच्या घरी फेस पॅक कसा बनवावा हे सांगितले आहे.

ग्रीन टीमध्ये (Green Tea) अँटी-ऑक्सिडेंटसारखे तत्व आढळतात. यामुळे त्वचेला तरुण राहण्याचे काम करतात. जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर तुम्ही ग्रीन टीच्यासाठी फेस पॅक खूप फायदेशीर ठरतो.

- Advertisement -

ग्रीन टी पॅक बनवण्यासाठी काय पाहिजे

 • ½ कप पाणी
 • 2 चमचे ग्रीन टी

असा बनवायचा ग्रीन टी पॅक

 • सर्व प्रथम, पाणी गरम करू घ्या.
 • एका भांड्यात २ चमचे ग्रीन टी टाका.
 • त्यावर गरम पाणी घाला आणि सुमारे 2 मिनिटे ठेवा.
 • हे पाणी थंड झाल्यावर चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या.
 • सुरकुत्याची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही याचा वापर करा.
- Advertisement -

ग्रीन टी पॅकचा वापर कसा करावा

 • ग्रीन टीमध्ये कापूस भिजवा.
 • कापसाच्या मदतीने ते चेहऱ्यावर लावा आणि कोरडे राहू द्या.
 • दररोज अशा प्रकारे चेहऱ्यावर ग्रीन टी लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील.

ग्रीन टीचे फायदे

 • ग्रीन टी चेहऱ्यावर वापरल्याने मुरुमांची समस्या कमी होते. कारण ते बंद झालेले छिद्र उघडण्यास मदत करते.
 • ग्रीन टीमध्ये व्हिटॅमिन ए आणि ई असते. यामुळे जीवनसत्त्वे तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते.
 • त्वचेवर जळजळ होण्याची समस्या असेल तरीही ग्रीन टी फायदेशीर असते. चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला थंडावा मिळेल.

या गोष्टी ठेवा

 • जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नयेत असे वाटत असेल, तर त्यासाठी तुम्ही रोज सनस्क्रीनचा वापर करणे बंधनकारक आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी अर्धा तास आधी सनस्क्रीन लावा.
 • दररोज चेहरा स्वच्छ करा. मृत त्वचेमुळे त्वचा निस्तेज तर होतेच पण, सुरकुत्या पडण्याचीही समस्या उद्भवू शकते.
 • दारू आणि धूम्रपान टाळा. या गोष्टी त्वचेला वयोवृद्ध करण्याचे काम करतात.
 • कोरड्या त्वचेमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात हे तुम्हाला माहीत आहे का? त्यामुळेच त्वचा ओलसर ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले जाते. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर आणि फेस मास्क वापरू शकता.
 • तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये व्हिटॅमिन सी असलेल्या उत्पादनांचा समावेश करावा. व्हिटॅमिन सी त्वचेला चमकदार बनवण्यापासून ते तरुण ठेवण्याचे काम करते.
 • चेहरा रिलॅक्स ठेवणे गरजेचे आहे. चेहऱ्यावर जास्त हालचाल केल्यानेही चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. यासोबतच त्वचेवर रसायन आधारित उत्पादने वापरू नका. त्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होते.

 

हेही वाचा – कोरफडचा रस ओल्या केसांवर लावावा की कोरड्या?

- Advertisment -

Manini