Friday, March 1, 2024
घरमानिनीBeautyहेअर रिमूव्हर क्रीम लावताय सावधान! त्वचेला होऊ शकतात 'हे' नुकसान

हेअर रिमूव्हर क्रीम लावताय सावधान! त्वचेला होऊ शकतात ‘हे’ नुकसान

Subscribe

त्वचेवर नको असलेले केस आपल्यापैकी कोणालाच चांगले दिसत नाहीत. साधारणपणे, या केसांपासून मुक्त होण्यासाठी, आपण वॅक्सिंग, थ्रेडिंग, रेझर इत्यादींचा अवलंब करतो. यापैकी सर्वात सुरक्षित उपाय म्हणजे घरगुती उपाय. मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष करत हेअर रिमूव्हर क्रिमचा पर्याय अवलंबवतो. असो ही आपली आवड निवड असू शकते, मात्र आपण हात किंवा अंडरआर्मच्या केसांना काढण्यासाठी जर हेअर रिमूव्हर क्रीमचा वापर करत असाल तर आपण सावध व्हायला हवे. हा पर्याय आपल्या त्वचेसाठी समस्या निर्माण करु शकतो. एका संशोधनात हेअर रिमूव्हर क्रीमचे काही साईड इफेक्ट दिसून आले आहेत.

रासायनिक बर्न-
केस काढण्याच्या क्रीममुळे केमिकल बर्न होण्याची शक्यता असते. खरं तर, जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेवर हेअर रिमूव्हर क्रीम लावता आणि ते जास्त काळ सोडता तेव्हा त्यामुळे जळजळ होऊ शकते. म्हणूनच, जर तुम्ही हेअर रिमूव्हर क्रीम वापरत असाल तर ते तुमच्या त्वचेवर निर्धारित वेळेपेक्षा जास्त ठेवू नका

- Advertisement -

रसायनांमुळे नुकसान-
कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड सारखी रसायने केस काढण्याच्या क्रीममध्ये आढळतात. नको असलेले केस काढण्यासोबतच ही रसायने तुमच्या त्वचेवर जळजळ देखील करतात. विशेषत: ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांना बराच काळ एक विचित्र जळजळ जाणवते. इतकंच नाही तर काही वेळा त्यांच्या त्वचेवर रॅशेसही येतात.

डार्क स्कीन-
हेअर रिमूव्हरच्या जास्त वापराने आपली स्कीन काळी पडू शकते. यात असलेल्या केमिकल्सचा आपल्या त्वचेवर विपरित परिणाम होत असतो. ही समस्या शक्यतो अंडरआर्ममध्ये जास्त पाहायला मिळते. तिथे पाहून असे वाटते की आपल्याला टॅनिंग झाले आहे.

- Advertisement -

एलर्जीची आणि रिअॅक्शन-
जर आपली स्कीन संवेदनशील असेल तसेच जळणे किंवा कापल्याची समस्या असेल तर चुकूनही हेअर रिमूव्हर क्रीमचा वापर करु नका. हेअर रिमूव्हलर क्रीमचा हा सर्वात सामान्य दुष्परिणाम आहे. वास्तविक, जेव्हा तुम्ही ही क्रीम तुमच्या त्वचेवर लावता तेव्हा त्याचा नैसर्गिक pH स्तरावर नकारात्मक परिणाम होतो.
ज्यामुळे तुम्हाला ऍलर्जी होऊ शकते आणि तुमची त्वचा खराब होऊ शकते. हे नुकसान सामान्य त्वचेवर सहज लक्षात येत नाही, परंतु संवेदनशील त्वचेला अशा प्रकारच्या ऍलर्जीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्वचेवर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्यावी.

खाज/ पुरळ होण्याची समस्या-
पुरळ होण्याची समस्या कित्येकदा वॅक्सिंग केल्यानंतरही उद्भवते, मात्र हेअर रिमूव्हल क्रीममधील केमिकल्समुळे ही समस्या अधिक वाढीस लागते. जर आपली त्वचा संवेदनशील आहे, तर ही समस्या जास्त वाढू शकते.

रफ स्किन-
हेअर रिमूव्हर क्रीमचा वारंवार वापर केल्याने काही काळानंतर आपल्या लक्षात आले असेल की आपले केस कडक आणि रुक्ष झाले असतील शिवाय स्किन देखील रफ झालेली असेल.

हेअर रिमूव्हर क्रीममधील केमिकल्समुळे असे दुष्परिणाम जाणून घेतल्यानंतर काळजीपूर्वक विचार करुनच हेअर रिमूव्हर क्रीम वापरण्याचे ठरवा.

 

 

- Advertisment -

Manini