Wednesday, April 24, 2024
घरमानिनीBeautyBeauty : स्त्रिया लिपस्टीक का लावतात?

Beauty : स्त्रिया लिपस्टीक का लावतात?

Subscribe

लिपस्टिक हा कॉस्मेटिक मधला सर्वात महत्वाचा विषय आहे. तसेच लिपस्टिक शिवाय मेकअप पूर्ण होत नाही. लिपस्टिक लावणे हल्लीच्या काळात महत्वाचा आणि प्रेसेंटेबल राहण्याचा मुख्य विषय आहे. आजकाल मेकअपच्या अनेक गोष्टी आपण नेहमी रोजच्या दिवसात बघतो. यामध्ये लिपस्टिक हा महिलांसाठी जवळचा विषय आहे. तसेच लिपस्टिक मध्ये खूप रंग आहेत आपल्या चेहऱ्याचा रंगानुसार आपण लिपस्टिकचा शेड चॉईस करत असतो. अशातच आता महिला या का लिपस्टिक लावतात ? काय आहे यामागची कहाणी आता आपण पाहणार आहोत.

Top 15 Trendy Lipstick Shades That Look Gorgeous on Dark Skin women - Styl Inc

- Advertisement -

मेकप करणे किंवा आकर्षक दिसण्यासाठी, तसेच सौंदर्य खुलवण्यासाठी विविध गोष्टींचा आधार घेणे यासाठी स्री आणि पुरुष कायम झटत असतात. बरं हे अगदी पूर्वापार चालत आलेलं आहे. प्राचीन भारत, ग्रीस, इजिप्त हे देश तर याबाबतीत फार प्रगत आहेत.

तू मेकपशिवाय चांगली दिसतेस वगैरे म्हटलं तरी व्यवस्थित तयार होऊन आरशात स्वतःला न्याहाळतांना छानच वाटते याबद्दल कोणाचे दुमत असणार नाही. माणसाची ही गरज लक्षात आल्यानेच मेकपचे सामान बनवणार्‍या कंपन्यांची नेहमी भरभराट होताना दिसते. कपडे, दागिने, पर्सेस, चप्पल आणि मेकप या कायम मागणीत असणार्‍या गोष्टी आहेत.

- Advertisement -

Lakme Lipstick Shades: Designed Exclusively For Trendy Women

महत्वाचे म्हणजे प्रत्येक रंगांचे एक मानसशास्र असते. आपल्या रंगांमध्ये लाल रंग हा पटकन नजरेत भरणारा असतो. माणसांना लाल रंग पटकन दिसणारा आणि अधिक काळ लक्षात राहणारा रंग आहे. रंगाच्या मानसशास्राप्रमाणे लाल रंगात लक्ष वेधून घेण्याची क्षमता असते. लाल रंग आकर्षण, ऊर्जा, उत्साह,आवड, इच्छा आणि प्रेम या सगळ्यांशी निगडीत आहे.

प्रेम आणि आकर्षण याच्याशी थेट संबंध असल्याने मेकपमध्ये लाल रंगाला प्राधान्य आहे. लाल ररंगाची लिपस्टिक, नेलपेंट याचा वापर म्हणूनच सर्वत्र दिसून येतो. बहुतेक महिला या लाल रंगाच्या लिपस्टिक लावताना आपल्याला पाहायला मिळतात.

New Mama Priyanka Chopra Takes This Lip Tint 'Everywhere' With Her – SheKnows

महिलांना सुंदर आणि आकर्षक दिसणं हे जन्मजात वाटत असतं. तसेच लाल रंगाच्या शेडचे आकर्षण बऱ्याच महिलांना असून हा रंग उठून दिसतो. तसेच लिप्स्टिकमुळे चेहरेपट्टी बदलते. महिलांच्या सौंदर्यात भर पडते. आणि म्हणूनच लिपस्टिक ही लावली जाते.

लिपस्टिक मध्ये मोठ्याप्रमाणात ब्रॅण्डिंग हे चालूच असते. अशातच महिलांनी छान दिसावे आणि महिलाच्या पर्सनल आयुष्यात एक नवीन छानसा लूक यावा. यासाठी महिला या प्रामुख्याने लिपस्टिकचा वापर जास्त करताना पाहायला मिळतात.


हेही वाचा : टिकली लावल्यानंतर खाज येत असेल तर ‘हे’ उपाय करा

- Advertisment -

Manini