Thursday, June 8, 2023
घर मानिनी Beauty घरच्या घरी Chocolate Facial असे करा

घरच्या घरी Chocolate Facial असे करा

Subscribe

फेशियल केल्याने चेहरा स्वच्छ आणि ग्लो होतो. यामुळेच महिन्यातून एकदा तरी फेशियल करावे असा सल्ला दिला दातो. पण तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चॉकलेटच्या मदतीने फेशिअल करु शकता. तर जाणून घेऊयात चॉकलेट फेशियल कसे कराल.

फेस क्लींज करा
1 चमचा कोको पावडर घेऊन त्यात 1 चमचा थंड दूध मिक्स करा. आता कॉटन पॅडच्या मदतीने ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि स्किन स्वच्छ करा.

- Advertisement -

फेस मसाज करा
1 चमचा कोको पावडर मध्ये 1 चमचा अॅलोवेरा जेल मिक्स करुन चेहऱ्याला लावा आणि काही वेळ मसाज करत रहा.

स्क्रब करा
स्क्रबसाठी 1 लहान चमचा कोको पावडर घेत त्यात 1 चमचा साखर आणि नारळाचे तेल मिक्स करा. ही पेस्ट आता चेहऱ्याला लावा आणि थोडा वेळ त्याने मसाज करा.

- Advertisement -

फेसपॅकचा वापर
1 चमचा मधात 1 चमचा कोको पावडर मिक्स करुन फेस पॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्याला लावा आणि 5-7 मिनिटांनी फेस क्लिन करा.

त्वचेला मॉइश्चराइज करा
1 चमचा कोको पावडर मध्ये 1/2 चमचा लिंबूचा रस आणि मलाई मिक्स करा. या पेस्टच्या मदतीने तुमची स्किन मॉइश्चराइज होईल.

चॉकलेटचे फायदे
स्किन सॉफ्ट बनवण्यासाठी तुम्ही सुद्धा चॉकलेटचा वापर करु शकता. या व्यतिरिक्त चेहऱ्यावरील सुरकुत्या सुद्धा कमी होण्यास मदत होते.


हेही वाचा- Aloe Vera Benefits : तुम्हाला अ‍ॅलोव्हेराचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का?

- Advertisment -

Manini