Saturday, February 24, 2024
घरमानिनीBeautyहेल्दी केसांसाठी हेअर टाइपनुसार निवडा शॅम्पू

हेल्दी केसांसाठी हेअर टाइपनुसार निवडा शॅम्पू

Subscribe

आपले केस सौंदर्यात भर घालत असतात. त्यामुळे केसांची योग्यरीत्या निगा राखणे गरजेचे असते. केसांची निगा राखण्यासाठी महिला अनेक पद्धतींचा अवलंब करतात. त्यापैकी एक म्हणजे शॅम्पू. पण, अनेक वेळा चुकीच्या हेअर शॅम्पूमुळे तुमच्या केसांचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे हेअरटाइपनुसार शॅम्पूची निवड करणे गरजेचे असते. शॅम्पूचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. पण, तुम्ही जो शॅम्पू केसांसाठी वापरताय तो तुमच्या केसांसाठी योग्यआहे का? हे जाणून घेणेही गरजेचे आहे.

अँटी डँड्रफ शॅम्पू –
मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी डँड्रफ शॅम्पू उपलब्ध आहेत. अनेक महिलांना डॅन्ड्रफची समस्या असते. यासाठी उत्तम दर्जाच्या अँटी डँड्रफ शॅम्पूची निवड करणे गरजेचे आहे. सॅलिसिलिक ॲसिडसह अँटी डँड्रफ शॅम्पूचा वापर तुम्ही कोंड्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी करू शकता.

- Advertisement -

क्लोरिफाईंग शॅम्पू –
ज्यांचे केस ऑइलि असतात त्यांनी क्लोरिफाईंग शॅम्पूची निवड करणे गरजेचे आहे. क्लोरिफाईंग शॅम्पूचा केसांना फायदा होतो. या शॅम्पूमध्ये सोडियम लॉरील सल्फेट असते. ज्याने केस स्वच्छ होतात. पण, दररोज हा शॅम्पू वापरल्यास नुकसान सुद्धा होऊ शकते.

- Advertisement -

सल्फेट नसलेला शॅम्पू –
सल्फेट केसांसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे ज्या शॅम्पूमध्ये सल्फेट जास्त आहे तो शॅम्पू विकत घेणे टाळा. सल्फेट असलेला शॅम्पू वापरल्याने केसांचे नैसर्गिक सौंदर्य नाहीसे होते.

आठवड्यातून किती वेळा हेअर वॉश करावा –
केसांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी आठवड्यातून किमान ३ वेळा केस स्वच्छ धुणे गरजेचे असते. ज्याने केसांचे सौंदर्य टिकून राहते.

 

 


हेही वाचा ; सुंदर त्वचेसाठी चेहऱ्यावर लावा राईस फेसपॅक

- Advertisment -

Manini