सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात हेल्द असो किंवा काम यामध्ये फार वेगाने बदल होत चालले आहेत. कामाचे वाढते प्रेशर आणि खाण्यापिण्याची चुकीची पद्धत यामुळे सतत काही समस्यांचा सामना करतो. या व्यतिरिक्त आजकाल लोकांची झोपेची वेळ ही बदलली गेली आहे. याचा थेट परिणाम आरोग्यावर ही होतो. अशातच डार्क सर्कलची समस्या ही उद्भवते.
थकवा, तणाव, झोप पूर्ण न झाल्याने डोळ्यांखाली डार्क सर्कल येऊ लागतात. याचे सर्वाधिक मोठे कारण म्हणजे तुम्ही घेत असलेला आहार. बहुतांश जण आपल्या आहारात पोषक तत्वांचा समावेश करत नाही. त्यामुळे डार्क सर्कलची समस्या उद्भवते. तुम्हाला सुद्धा डार्क सर्कलची समस्या असेल तर पुढील काही न्युट्रिएंट्सता तुमच्या डाएटमध्ये समावेश करा.
व्हिटॅमिन सी
हे अँन्टीऑक्सिटेंज व्हिटॅमिन कोलेजनच्या रचनेत महत्वपूर्ण भुमिका बजावते. यामुळे तुमच्या डोळ्यांखालील नाजूक त्वचा मजबूत होते. अशातच तुमच्या डाएटमध्ये व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करा. जसे की, तुरट फळं, स्ट्रॉबेरी, शिमला मिर्ची आणि हिरव्या भाज्या.
व्हिटॅमिन के
हे रक्तात होणाऱ्या गुठळ्या तयार होण्यास मदत करते. तुमच्या डोळ्याखालील पातळ त्वचेमधून दिसणाऱ्या ब्लड वेसल्सच्या कारणमुळे तुमचे डार्क सर्कल दूर होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट्सच्या माध्यमातून व्हिटॅमिन के मिळवू शकता.
व्हिटॅमिन ई
अँन्टिऑक्सिडेंट युक्त व्हिटॅमिन ई मुळे त्वचेला नुकसान पोहचत नाही. व्हिटॅमिन ई युक्त पदार्थांमध्ये बिया, पालक आणि एवोकाडोचा समावेश आहे.
ओमेगा-3 फॅटी अॅसिड
या हेल्दी फॅट्समध्य अँन्टी इंफ्लेमेटरी गुण असतात. जे त्वचेसाठी फार फायदेशीर मानले जातात. ओमेगा-3 फॅटी अॅसिडचा उत्तम स्रोत म्हणजे सामन, मॅकेरल, सार्डिन असे मासे, अळशी, चिया सीड्स आणि अक्रोडचा सुद्धा समावेश आहे.
बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन
बी व्हिटॅमिन जसे, बायोटिन (बी7) आणि नियासिनमाइड (बी3), त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्यांखालील डार्क सर्कल दूर होऊ शकतात. बायोटिन हे अंडी, नट्स आणि तृणधान्यातून मिळते. तर नियासिनमाइड मासे, मांस, शेंगदाण्यांमधून मिळते.
लोह
लोहच्या कमतरतेमुळे डार्क सर्कल्स वाढू शकतात. खासकरुन जर हे एनिमिया असेल. लोहाच्या उत्तम स्रोतात लीन मीट, पोल्ट्री, सी-फूड, बीन्स, हिरव्या पालेभाज्या आणि फोर्टिफाइड कडधान्यांचा समावेश आहे.
हेही वाचा- चेहऱ्यावरील Fine Lines घालवण्यासाठी ‘हा’ फेस पॅक वापरा