Sunday, April 21, 2024
घरमानिनीBeautyकेस गळती टाळण्यासाठी करा 'हे' 6 उपाय

केस गळती टाळण्यासाठी करा ‘हे’ 6 उपाय

Subscribe

केस गळती, केस निस्तेज किंवा कोंडा अशा अनेक समस्या प्रत्येकालाच भेडसावत आहेत. केसांच्या निरोगी आरोग्यासाठी केवळ चांगले उत्पादने वापरून उपयोग नाही तर केसांची योग्यरीत्या काळजी घेणेही गरजेचे असते. अनेकदा महागडे हेअर प्रोडक्स्ट वापरून सुद्धा केस गळतीची समस्या थांबवता येत नाही. अशावेळी तुमच्या टाळूकडे अर्थात स्कॅल्पकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण निरोगी टाळू असेल तरच केसांचे आरोग्य निरोगी राहते.

स्कॅल्पची काळजी कशी घ्याल?

- Advertisement -

केसांची योग्यरित्या निगा राखणारे उत्पादने –
सल्फेट्स, अल्कोहोल किंवा हानिकारक उत्पादने टाळणे स्कॅल्पचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत करते. सल्फेट केसांमधून नैसर्गिक तेल काढून टाकते. जर तुमचा स्कॅल्प सेन्सिटिव्ह असेल तर अल्कोहोल आणि सुगंधी उत्पादने वापरल्याने केसांमधील ओलावा शोषला जातो. ज्याने केस कोरडे, कुरळे आणि खराब होतात. परिणामी, जळजळ होऊन स्कॅल्प कोरडा होईल तसेच तुम्हाला खाजही येईल. त्यामुळे सौम्य आणि जेंटल हेअर केअर प्रोडक्ट्स वापरा.

केस सतत धुवू नका –
अनेक जणी तेलकट केस टाळण्यासाठी वारंवार केस धुतात. मात्र असे करणे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. केसांना वारंवार शॅम्पू केल्याने केसातील नैसर्गिक तेल निघून जाते. त्यामुळे आठवड्यातून केस दोन वेळाच धुवा. असे केल्याने स्कॅल्पचा पीएच कायम राहतो. याशिवाय स्कॅल्प ऑईलचे व्यवस्थापन केल्याने केसांची निरोगी वाढ होण्यास मदत मिळते.

- Advertisement -

अँटीऑक्सडेंट्स घ्या –
शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्सचे प्रमाण अँटीऑक्सीडेंट्सच्या प्रमाणापेक्षा जास्त होते तेव्हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस येतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे डायबिटीस, हार्ट प्रॉब्लेम आणि कँसर यासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण मिळतेच शिवाय याचा स्कॅल्पच्या आरोग्यावरही परिणाम होतो आणि केस गळू लागतात. अशा वेळी हिरव्या पालेभाज्या आणि अँटीऑक्सीडेटिव्ह असलेले पदार्थ खायला हवेत.

स्कॅल्प स्क्रब वापरा –
स्कॅल्प स्क्रब तुमच्या स्कॅल्पला एक्सफॉलिएट करण्याचा उत्तम मार्ग आहे. यासाठी बाजारातून केमिकल्स असलेले स्क्रब खरेदी करू नका, घरच्या घरी स्क्रब बनवा आणि ते वापरा. अशाने तुमच्या स्कॅल्पचे पीएच संतुलित राहील आणि केसांमध्ये नैसर्गिक तेलही टिकून राहील. ज्यामुळे केसांची निरोगी वाढ होण्यास मदत मिळेल.

स्कॅल्पला मसाज द्या –
आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्कॅल्पला केसांना तेलाने मसाज करा. यासाठी तुम्हाला स्कॅल्पवर वर्तुळाकार हालचालीत बोटानी मालिश करायची आहे. असे केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन तुमच्या स्कॅल्पपर्यत पोहोचेल. ज्याने केसांची गळती थांबून वाढ होण्यास मदत मिळेल.

सूर्यप्रकाशापासून केसांचे संरक्षण करा –
ज्याप्रमाणे आपण आपल्या चेहऱ्यचे आणि शरीराचे रक्षण करतो त्याचे प्रमाणे केसांच्या आरोग्यासाठी सूर्यप्रकाशापासून
केसांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. अशावेळी तुम्ही उन्हात जाताना टोपी घालून किंवा स्कार्फ गुंडाळून केसांचे उन्हापासून रक्षण करू शकता.

 

 

 


हेही वाचा : लांबसडक केसांसाठी कांदा उपयुक्त

- Advertisment -

Manini