Thursday, December 7, 2023
घरमानिनीBeautyसुंदर पापण्यांसाठी करा 'हे' उपाय

सुंदर पापण्यांसाठी करा ‘हे’ उपाय

Subscribe

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी डोळ्यांचे सौंदर्य खूप महत्त्वाचे आहे. अशातच जर तुमच्या जाड आणि काळ्या पापण्या असतील तर नक्कीच तुमचा चेहरा हा अधिक आकर्षक दिसतो. आजकाल महिला कॉस्मेटिक्स पापण्या वापरतात. ज्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते.

पण जर का तुम्हाला तुमच्या पापण्या नैसर्गिकरित्या वाढवायच्या असतील तर तुम्ही हे घरगुती उपाय करून पहा. तसेच तुम्ही पापण्यांच्या वाढीसाठी खोबरेल तेल वापरू शकता. याशिवाय इतरही अनेक तेले आहेत जे तुम्हाला तुमच्या पापण्या सुंदर बनवण्यास लगेच मदत करू शकतात. तसेच तुम्ही या पुढील तेलांचा वापर तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांना रात्री जोपताना करू शकता. ज्यामुळे पापण्यांची चांगली वाढ होईल.

- Advertisement -

How to Safely Get the Long Eyelashes You Want

1. एरंडेल तेल

पापण्यांच्या वाढीसाठी एरंडेल तेल खूप फायदेशीर ठरू शकते. या तेलाचा वापर केल्याने पापण्या दाट होतात. तसेच हे तेल पापण्या जर का गळत असतील तर या तेलामुळे त्या थांबतात. तसेच हे तेल वापरण्यासाठी खोबरेल तेलात एक चमचा त्यात एरंडेल तेल मिसळून रोज रात्री कापसाच्या मदतीने पापण्यांवर लावा, नंतर सकाळी धुवा. असे केल्याने पापण्या लवकर वाढतात.

- Advertisement -

2. ऑलिव तेल

ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाणा जास्त असते. तसेच हे तेल पापण्या वाढण्यास मदत करू शकते. ऑलिव्ह ऑइल जाड आणि काळ्या पापण्यांसाठी एक प्रभावी उपाय आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी पापण्यांवर ऑलिव्ह ऑइल लावा. याचा तुम्हाला फरक लगेच दिसून येईल.

3. खोबरेल तेल

पापण्या सुंदर आणि रेखीव दिसण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाची मदत घेऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ऑलिव्ह ऑईल आणि खोबरेल तेल एकत्र मिक्स करून रात्री झोपण्यापूर्वी पापण्यांवर लावू शकता आणि सकाळी पाण्याने ते धुवू शकता. असे आठवड्यातून दोनदा केल्यास फरक जाणवेल.

4. कोरफड जेल

अॅलोवेरा जेलमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात . तसेच जाड आणि रेखीव पापण्यांसाठी कोरफड जेल हा एक उत्तम उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे पापण्यांवर कोरफडीचे जेल लावा आणि सकाळी स्वच्छ धुवून टाका.

5. ग्रीन टी

काळेभोर पापण्यांसाठी डोळ्याला तुम्ही ग्रीन टी लावू शकता. तसेच ग्री टीमूळे पापण्यांना तेज मिळते. ग्रीन टी बनवून त्याला थंड करा. आणि मग नंतर हळूवारपणे पापण्यांवर लावा. तसेच हे लावत असताना डोळ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या.


हेही वाचा :  चेहऱ्याला ग्लिसरीन लावण्यापूर्वी ‘या’ टीप्स करा फॉलो

- Advertisment -

Manini