Saturday, April 20, 2024
घरमानिनीBeautyAloe Vera Benefits : तुम्हाला अ‍ॅलोव्हेराचे 'हे' फायदे माहीत आहेत का?

Aloe Vera Benefits : तुम्हाला अ‍ॅलोव्हेराचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का?

Subscribe

उन्हाळ्याच्या दिवसात, तुमची त्वचा सूर्य, वारा आणि स्विमिंग पूलमधील क्लोरीनचे पाणी यांच्या संपर्कात आल्यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. तेव्हा तुम्ही अ‍ॅलोव्हेरा जेल वापर करू शकता आणि तुमच्या त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चरायझ म्हणून मदत होईल.

अ‍ॅलोव्हेरा जेलचा (Aloe Vera Gel) वापर हा आपल्या त्वचा, केस आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अ‍ॅलोव्हेरा जेलमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अ‍ॅलोव्हेरा जेल हे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम करते. अ‍ॅलोव्हेरा जेलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी (Anti-inflammatory), अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी ऑक्सिडंट (Anti-oxidant) यासारखे गुणधर्म आहेत. अ‍ॅलोव्हेरा जेलचा वापर हा सनबर्न (Sunburn), जळजळ, त्वचा जळणे इत्यादीसाठी वापरतात. यामुळे उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या त्वचेवर अ‍ॅलोव्हेरा जेलचा कसा वापर करू शकता. हे आपण जाणून घेऊ या.

अ‍ॅलोव्हेरा जेल हे त्वचाला मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. उन्हाळ्याच्या दिवसात, तुमची त्वचा सूर्य, वारा आणि स्विमिंग पूलमधील क्लोरीनचे पाणी यांच्या संपर्कात आल्यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. तेव्हा तुम्ही अ‍ॅलोव्हेरा जेल वापर करू शकता आणि तुमच्या त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चरायझ म्हणून मदत होईल. यात नैसर्गिक तेले असल्यामुळे तुमची तत्वचा कोमल आणि त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.

- Advertisement -

१. अ‍ॅलोव्हेरा जेल म्हणून एक्सफोलिएटर

अ‍ॅलोव्हेरा जेल हे प्रदूषण आणि धूळमुळे आपल्या चेहऱ्यावर घाणीचा थर जमा होतो. यामुळे चेहऱ्याची चमक निघून जाते. चेहऱ्यावरील चमक परत आणण्यासाठी एक्सोफिलएटर करणे गरजेचे आहे. रिसर्च गेटमध्ये प्रशाशित झालेल्या जनर्लनुसार, अ‍ॅलोव्हेरा जेल एक्सोफिलएटर म्हणून वापर केला जाऊ शकतो. अ‍ॅलोव्हेरा जेल स्क्रब केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील किंवा त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. यामुळे तुमचा चेहरा उजळतो आणि एक्सफोलिएट केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील घाण आणि डाग दूर होण्यास मदत होते.

- Advertisement -

 २. अ‍ॅलोव्हेरा जेल कोलेजन बूस्टर

त्वेचला तरुण आणि त्वेचेची इलास्टिसिटी कायम राखण्यासाठी कोलेजनची नितात आवश्यकता असते. कोलेजन त्वचामध्ये कोमल आणि आर्द्रता राखण्याचे काम करते. अ‍ॅलोव्हेरा जेलमध्ये स्टेरॉल्स असते, मोलिक्युल्स असतात. जे त्वचचे कोलेजन वाढवण्याचे काम करते.

३ मॉइश्चराइझर म्हणून अ‍ॅलोव्हेरा जेलचा वापर

त्वचला सुंदर बनवणे आणि हाइड्रेट ठेवण्यासाठी मॉइस्चराइझिंग करणे खूप गरजेचे असते. मॉइश्चरायझिंग क्रीम तुमच्या त्वेचमध्ये आर्द्रता ठिकवून ठेवण्याचे काम करते. तुम्ही त्वचचे मॉइश्चराइझ केले नाही, तर तुमची त्वचा रुक्ष आणि निस्तेज बनते.

अ‍ॅलोव्हेरा जेलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. यामुळे त्वचेतील मॉइस्चराइझर लॉक करण्यास मदत होते. अ‍ॅलोव्हेरा जेलमध्ये म्यूकोपॉलीसेकेराइड्स असते. यामुळे तुमच्या त्वचचेतील आर्द्रता कायम ठेवण्यास मदत होते. अ‍ॅलोव्हेरा जेल त्वचचेतील आर्द्रता वाढवते. ज्यांची त्वचा कोरडी असते, त्यांच्यासाठी अ‍ॅलोव्हेरा जेल फायदेशीर मानले जाते.

अ‍ॅलोव्हेरा जेल कूलिंग मास्क

अ‍ॅलोव्हेरा जेलमध्ये त्वचा थंड ठेवण्याचे गुण असतात. यामुळे उन्हाळ्यात अ‍ॅलोव्हेरा जेलचा वापर त्वचचा थंड ठेवण्यास मदत करते. यात अँटी-इंफ्लेमेटरी असते. यामुळे सनबर्न आणि त्वचची जळजळ कमी करण्यास मदत होते. उन्हात निघण्यापूर्वी अ‍ॅलोव्हेरा जेल त्वचचेवर लावावे. यामुळे तुमची त्वचा सुरक्षित ठेवण्याचे काम अ‍ॅलोव्हेरा जेल करते. ज्यामुळे तुम्हाला सनबर्नसारख्या समस्या भेडसावत नाहीत.

हेही वाचा – फेशियलमुळे चेहराच नाही तर मनही होत रिलॅक्स

 

- Advertisment -

Manini