पुरुषांमध्ये फेशिअल हेअर येणे सामान्य आणि अॅट्रॅक्टिव्ह मानले जाते. मात्र महिलांमध्ये तेवढे हे सामान्य नाही. केवळ पुरुषच नव्हे तर महिलांच्या चेहऱ्यावर सुद्धा केस असतात. परंतु महिलांच्या चेहऱ्यावर हे केस डार्क आणि जाड असतील तर त्यामागे काही कारणे असू शकतात. महिलांना या समस्येपासून दूर रहायचे असेल तर बहुतांश जणी शेविंग, वॅक्सिंग, प्लकिंग किंवा केमिकल्सचा वापर करतात. यासाठी काही ट्रिटमेंट्स जसे की, लेजर, इलेक्ट्रोलाइसिसची मदत घेतली जाते. मात्र सर्व या मेथड्स महाग असतात. यामुळे स्किन इरिटेशन सुद्धा होऊ शकते. अशातच जाणून घेऊयात महिलांमध्ये फेशियल हेअर ग्रोथची नक्की कारणे काय आहेत.
-हार्मोन
हिर्सुटिज्म असे एक डिसऑर्डर आहे ज्यामध्ये रोग्याच्या चेहऱ्यावर जीन्स, हार्मोनल चेंजेज आणि कुशिंग सिंड्रोमच्या कारणास्तव अत्याधिक केस येऊ शकता. या समस्येला कंट्रोल करणे शक्य नाही. मात्र न्युट्रिशियस आणि बॅलेंस्ड डाएट, दररोज एक्सरसाइज आणि मेडिसिन्सचा वापर कमी केल्याने ही समस्या कमी होऊ शकते.
पॉलिसिस्टिक ओवरीन सिंड्रोम
जर एखाद्याला पॉलिसिस्टिक ओवरीयन सिंड्रोम किंवा हार्मोनल इम्बॅलिन्सची समस्या असेल तर त्या व्यक्तीमध्ये मेल हार्मोन अँन्ड्रोजनचे प्रोडक्शन अधिक प्रमाणात होऊ शकते. यामुळे चेहऱ्यावर अधिक केस सुद्धा येऊ शकतात.
जेनेटिक्स
जेनेटिक्स सुद्धा फेशियल हेअर ग्रोथसाठी जबाबदार असू शकतात. त्यामुळे आपली आई, बहिण किंवा आजीला जाड फेशियल हेअर असतील तर ती समस्या तुम्हाला सुद्धा होऊ शकते.
हेही वाचा- Face Waxing Care : फेस वॅक्ससिंग करताना घ्या ‘अशी’ काळजी