Monday, December 4, 2023
घरमानिनीBeautyतजेलदार त्वचेसाठी डाएटमध्ये घ्या हे पदार्थ

तजेलदार त्वचेसाठी डाएटमध्ये घ्या हे पदार्थ

Subscribe

प्रदूषण,ताण तणाव, बिझी लाईफस्टाईल याचा परिणाम जसा आपल्या आरोग्यावर होतो तसाच तो त्वचेवरही होतो. कारण शरीराची योग्य देखभाल होत नसल्याने त्वचाही निस्तेज दिसू लागते. यामुळे डाएटमध्ये काही पदार्थांचा समावेश करावेत. ज्याचा परिणाम लगेचच त्वचेवरही दिसू लागतो आणि निस्तेज त्वचा उजळते.

beets-beet-juice

- Advertisement -

बीट
लालबुंद रंगाचे हे कंदमुळ त्वचेसाठी वरदान आहे. बीटमध्ये अॅटी ऑक्सिडेंट्सचे प्रमाण मुबलक असते. ज्यामुळे त्वचा उजळते. रक्तशुद्धीकरणातही बीट फायदेशीर आहे. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात. चेहऱ्यावरील मुरुम, पुटकुळ्या जातात.

- Advertisement -

बदाम

बदामामध्ये अनेक पोषक घटक आहेत. ज्यामुळे त्वचा उजळते. प्रामुख्याने बदामातील व्हिटामीन ईमुळे सुरकुत्या आणि डार्क स्पॉट्स कमी होतात.

गाजर
गाजरामध्ये व्हिटामीन ए असते. जे जुन्या पेशींना हटवण्याचे काम करते.कोलाजेन बनवण्यातही गाजर मदत करते. यामुळे वाढलेलं वय कळून येत नाही. त्वचा मुलायम करण्यातही गाजर महत्वाचे असते.

Orange
 

आंबट फळे
संत्री, मोसंबी, लिंबू या फळांमध्ये व्हिटामीन सी मुबलक असते. ज्यामुळे त्वचा उजळते. तसेच त्वचेतील नवीन पेशी तयार करण्यातही व्हिटामीन सी महत्वाचे असते.

- Advertisment -

Manini