Thursday, June 8, 2023
घर मानिनी Beauty तुमच्या केसांचे 'हे' सीक्रेट्स सांगतील तुमच्या आरोग्याबद्दल अधिक

तुमच्या केसांचे ‘हे’ सीक्रेट्स सांगतील तुमच्या आरोग्याबद्दल अधिक

Subscribe

केसांची काळजी न घेतल्यास काही समस्या उद्भवतात हे आपल्या सर्वांनाच माहिती असते. परंतु केसांसाठी विविध प्रोडक्ट्स वापरुन हेअर स्टाइल केल्यानंतर काळजी सुद्धा तितकीच घ्यावी लागते. अन्यथा केस गळती अशा समस्या उद्भवू शकतात. पण तुम्हाला माहितेय का तुमच्या केसांचे सीक्रेट्स हे तुमच्या आरोग्यासंदर्भात काही गोष्टींचे संकेत देतात? याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

-केस गळतीची समस्या असेल

- Advertisement -


ही समस्या दीर्घकाळ होत असेल तर तु्म्ही PCOS चा सामना करत आहात. थोड्या प्रमाणात केस गळती होणे सामान्य बाब आहे. परंतु खुप केस गळण्यास सुरुवात झाली असेल तर वेळीच काळजी घेण्याचे संकेत दिले जातात. हार्मोन्स मध्ये होणाऱ्या बदलावासाठी मेनोपॉज, प्रेग्नेंसी, थायरॉइड किंवा मधुमेह कारणीभूत ठरु शकतात. परिणामी तणाव वाढू शकतो. यापासून दूर राहण्यासाठी मल्टिव्हिटामिन्सचे सेवन तुम्ही करु शकता.

-केसांच्या मुळांच्या येथे पॅचेस आले असतील

- Advertisement -


सोरायसिस हे पॅचेस येण्यामागील कारण आहे. हा एक स्वयंप्रतिकार रोग असून यामध्ये तुमच्या त्वचेच्या पेशी सामान्य स्तरापेक्षा अधिक वाढल्या जातात. त्यामुळे पॅजेस तयार होतात. असे झाल्यास तुमच्या केसांच्या मुळांच्या येथे खाज येणे, ल्युपल अशा समस्या उद्भवू शकतात. जर स्थिती अधिक बिघडली गेली आणि तुम्हाला माहिती नसेल हा कोंडा आहे का तर तुम्ही स्किन तज्ञांना भेटा.

-तुमच्या केस निस्तेज झाले असतील


तुमचे केस निस्तेज झाले असतील तर त्यामागील मुख्य कारण म्हणजे तुम्ही डिहाइड्रेट आहात. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्या आणि या समस्येपासून दूर रहा. या व्यतिरिक्त तुमचे केस निस्तेज दिसण्यामागील आणखी एक कारण म्हणजे तुम्ही योग्य पदार्थ खात नाहीत. तुम्ही जे खाता त्याचा प्रभाव तुमच्या केसांवर सुद्धा होतो. त्यामुळे प्रोसेस्ड फूड पासून दूर राहिले पाहिजे. ऑर्गेनिक फळ-भाज्यांचे सेवन करावे.

-केसांत यल्लो फ्लेक्स असतील


केसांत आलेल्या यल्लो फ्लेक्सला तुम्ही कोंडा समजत असाल तर तसे नाही. ते खरंतर सेबेरिएट डर्मेटाइटिस (Seborrheic Dermatitis) चा सामना करत आहात. केसांच्या मुळाच्या येथे ही समस्या निर्माण होते. काही विशिष्ट शॅम्पू आणि क्रिमच्या माध्यमातून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

-जर तुमचे प्री-मेच्योर ग्रे हेअर असतील


प्री-मेच्योर ग्रे हेअर हे जेनेटिक आहेत. पण ते अधिक प्रमाणात असतील तर त्यामागील कारण तणाव ठरु शकते. काही संशोधनातून सुद्धा असे समोर आले आहे की, ग्रे हेअर आणि तणावाचा थेट संबंध आहे. तणावामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अशातच सातत्याने केस ग्रे होऊ लागतात. या व्यतिरिक्त शरिरात विटामिन्सच्या कमतरतेमुळे सुद्धा ही समस्या उद्भवू शकते.


हेही वाचा- महिलांच्या ‘या’ आजारपणामुळे गळतात केस

- Advertisment -

Manini