Monday, April 15, 2024
घरमानिनीBeauty'चामखीळ'वर घरगुती उपाय

‘चामखीळ’वर घरगुती उपाय

Subscribe

अनेक जणांना चेहरा, हात, पाय, पोट, ओठ आदी भागांवर चामखीळ असते. खरं तर, चामखीळमुळे वेदना होत नाही ना, शरीराला कोणती हानी होत. असे असले तरी बरचे जण चामखीळपासून मुक्तता मिळविण्यासाठी अनेक उपाय करत असतात. इतकंच काय तर शरीरावर चामखीळ असल्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो तर काहींना ही लाजिरवाणी गोष्ट वाटते. आज आम्ही तुम्हाला चामखीळपासून मुक्तता मिळविण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

लसूण पेस्ट –
गुणकारी लसूण ही चामखीळवर देखील उपयुक्त आहे. हा उपाय करण्यासाठी प्रथम लसूण पाकळ्या सोलून घ्या. सोलून झाल्यावर त्याची पेस्ट बनवून घ्या. तयार पेस्ट चामखीळवर लावा आणि त्यावर पट्टी बांधा. थोड्यावेळाने पट्टी काढून जागा स्वच्छ करून घ्या. हा उपाय काही दिवस सातत्याने करा.

- Advertisement -

बेकिंग सोडा –
चामखीळ दूर करण्यासाठी एका चमचा बेकिंग सोडा, एरंडेल तेलाचे काही थेंब टाकून पेस्ट तयार करून घ्या. तयार पेस्ट चामखीळवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यानंतर तासाभराने पेस्ट लावेलला भाग स्वच्छ धुवून घ्या. सतत महिनाभर हा उपाय केल्यास तुम्हाला चामखीळपासुन सुटका मिळेल.

- Advertisement -

ऍपल सायडर व्हिनेगर –
ऍपल सायडर व्हिनेगर चामखीळ काढण्यासाठी देखील वापरू शकता. सर्वात आधी २ चमचे ऍपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळा. तयार झालेले लिक्विड कापसाच्या साहाय्याने चामखीळवर लावा. आता ही चामखीळ 3 ते 4 मिनिटे पट्टीने थोडावेळ झाकून ठेवा. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हा उपाय दिवसातून एकदा तरी करा.

एरंडेल तेल –
चामखीळच्या समस्येपासून सुटका होण्यासाठी एरंडेल तेल हे फार प्रभावी ठरते. एरंडेल तेलामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्याकारणाने त्वचेवरील चामखीळ, दाद आणि कोरडेपणाच्या समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरते. तुम्ही दररोज एरंडेल तेल चामखीळवर लावू शकता. दररोज असे केल्याने 3 ते 4 आठवड्याच्या कालावधीत तुमची चामखीळ नाहीशी होईल.

ताजे कोरफड जेल –
कोरफडीच्या पानांपासून ताजे कोरफड जेल काढून घ्या. दररोज हे जेल चामखीळ वर लावा. हा उपाय दिवसातून 3 ते 4 वेळा करा. कोरफडमध्ये असलेले नैसर्गिक आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म चामखीळ लवकर कोरडे होण्यास मदत करतात.

 

 


हेही वाचा : चमकदार त्वचेसाठी करा बिटाचा वापर

 

- Advertisment -

Manini