Friday, February 7, 2025
HomeमानिनीBeautySkin Care Tips : त्वचा ऑइली असेल तर, मॉइश्चरायझर लावावं का?

Skin Care Tips : त्वचा ऑइली असेल तर, मॉइश्चरायझर लावावं का?

Subscribe

प्रत्येकालाच आपली त्वचा नितळ, सुंदर आणि तजेलदार हवी असते. यासाठी आपल्या त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक गोष्टी फॉलो करतो. काही लोक स्किन केअर रूटीन फॉलो करण्यापासून ते फेसवॉश करण्यापर्यंत आपल्या स्किनची काळजी घेतात. पण स्किन रूटीन फॉलो करताना कळत नकळतपणे अनेक चुका वारंवार होतात. तेलकट त्वचेमध्ये, त्वचेमध्ये उपस्थित असलेल्या तेल ग्रंथी खूप मोठ्या असतात आणि मोठ्या प्रमाणात तेल तयार करतात. जे चेहऱ्यावर दिसते आणि त्यामुळे छिद्र बंद होतात. ज्यामुळे मुरुमे होऊ लागतात. तज्ञांच्या मते, तेलकट त्वचेवर या गोष्टी लावणे पूर्णपणे टाळावे.

पेट्रोलियम जेली

तज्ज्ञांच्या मते, तेलकट त्वचेवर थिक मॉइश्चरायझर आणि क्रीम लावणे टाळावे. त्याऐवजी जेल बेस्ड मॉइश्चरायझर लावा. हे त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करेल. मॉइश्चरायझर कोरड्या आणि डिहायड्रेट त्वचेसाठी आहे. ज्यामध्ये पॅराफिन, मिनरल ऑइल आणि पेट्रोलियम मिक्स असते. जे तेलकट त्वचेचे छिद्र रोखू शकतात.

ऑइल बेस्ड मॉइश्चरायझर

बऱ्याच वेळा असे होते की त्वचा तेलकट आहे हे आपण विसरतो, अशा परिस्थितीत आपण चेहऱ्यावर तेल आधारित मॉइश्चरायझर वापरतो. यामुळे त्वचेवर पूर्वीपेक्षा जास्त तेल जमा होते, त्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही मॉइश्चरायझर वापरता तेव्हा लक्षात ठेवा की चेहऱ्यावर फक्त ऑइल फ्री मॉइश्चरायझर लावा जेणेकरून त्वचा निरोगी राहील.

कोकोनट ऑइल किंवा फेस ऑइल

आजकाल त्वचा चमकदार दिसण्यासाठी चेहऱ्याला तेल लावण्याची फॅशन झाली आहे. पण तेलकट त्वचेवर तेल लावल्याने छिद्र सहजपणे ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे मुरुम आणि रॅशेसची समस्या वाढू शकते.

क्रीमी बेस्ड मॉइश्चरायझर

त्वचा तेलकट असेल तर त्यावर धूळ सर्वाधिक चिकटते, त्यामुळे त्वचेचा रंग गडद आणि निस्तेज दिसतो. त्यामुळे नेहमी जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरा, ते वजनाने हलके आहे आणि त्वचा चिकट दिसत नाही. यामुळे तुमची त्वचाही हलकी राहते आणि स्किन टोन नॉर्मल राहते. कारण ते त्वचेत सहज शोषले जाते. त्यामुळे छिद्रे लॉक होतात.

आर्टिफिशीयल कलर

तेलकट त्वचेवर ब्लश, लिपस्टिकसारख्या रंगाच्या गोष्टी लावू नका. बहुतेक ब्लश वगैरे पेट्रोलियम किंवा बिटुमेनपासून बनवलेले असतात. याचा काही त्वचेवर परिणाम दिसून येत नाही, पण त्वचेवर पुरळ येऊ शकतात. आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात.

Manini