प्रत्येकाची त्वचा ही वेग वेगळी असते. काही जणांची त्वचा ही तेलकट असते, काही जणांची कोरडी असते तर काही जणांची त्वचा नॉर्मल म्हणजेच सामान्य असते. तसेच मार्केटमध्ये मेकअप आणि स्किन केअरची अनेक उत्पादने उपलब्ध आहेत जी तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन बनवली जातात. आपल्यापैकी अनेकांना आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे माहित नसते. अशातच आता टेन्शन घ्यायचे काहीच कारण नाही. आपण काही सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घेऊ शकाल. चला तर मग आज जाणून घेऊया त्वचेचा योग्य प्रकार कसा ओळखायचा…
1. सामान्य त्वचा
सामान्य त्वचेमध्ये त्वचा पूर्णपणे स्वच्छ असते. तसेच सामान्य त्वचेला सर्वोत्तम त्वचेचा प्रकार म्हणून ओळखला जातो. ही त्वचा खूप कोरडे किंवा तेलकट नसते. तसेच कोणत्याही प्रकारचे freckles या सामान्य त्वचेवर येत नाहीत. तसेच त्यांचा चेहऱ्यावर छिद्र दिसत नाहीत. आणि त्यांची त्वचा तेलकट किंवा कोरडेही त्यामुळे होत नाही.
2. तेलकट त्वचा
ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांचा चेहरा चमकदार दिसतो. पण तेलकट त्वचेवर चेहऱ्यावर लगेच स्पॉट दिसतात. तसेच ज्यांची त्वचा ऑईली आहे त्यांना पुरळ येण्याची शक्यता जास्त असते. तसेच त्यांना मुरुमं येण्याची शक्यता जास्त असते.
3. कोरडी त्वचा
ज्या लोकांची त्वचा कोरडी असते त्यांच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थ ताण दिसतो तसेच काही छिद्र देखील दिसतात. यासोबतच त्यांच्या चेहऱ्यावर बारीक पुरळ येत असतात. तसेच त्यांच्या त्वचेमध्ये आर्द्रतेची तीव्र कमतरता असते. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर सहजपणे सुरकुत्या पडतात.
4. संवेदनशील त्वचा
ज्या व्यक्तींची त्वचा संवेदनशील असते. त्यांच्या त्वचेवर लगेच लालसरपणा दिसून येतो. तसेच त्यांच्या स्किनला लगेच खाज येते. त्यामुळे अशा व्यक्तींनी कॉस्मेटिकस प्रॉडक्ट्स किंवा अन्य गोष्टीचा अतिवापर करू नये. कारण यामुळे चेहऱ्याला पुरळ येऊ शकतात.
5. कॉम्बिनेशन स्किन
या प्रकारच्या त्वचेमध्ये नाकावर आणि कपाळावर तेलकटपणा दिसून येतो. तर उर्वरित भाग हा पूर्णपणे कोरडा दिसतो. तसेच यामध्ये त्वचेचे दोन प्रकार पडतात. ते म्हणजे तेलकट त्वचा, आणि तेलकट कोरडी त्वचा. अशी स्किन असणाऱ्या लोकांनी जास्त उन्हात जाऊ नये. यामुळे त्यांच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.
_______________________________________________________________________
हेही वाचा : थंडीत स्किन ड्राय झाल्यास करा ‘हा’ छोटा उपाय