सुंदर, दाट आणि लांब केस कोणाला नको असतात, पण या धकाधकीच्या जीवनात केसांची योग्य काळजी घेणं खूप अवघड आहे. वाढते प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग आणि इतर नैसर्गिक बदलांमुळे केस अधिकच खराब आणि कमकुवत होत आहेत. यासोबतच सूर्याच्या हानिकारक किरणांचा टाळूच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे लोकांच्या केसांची वाढ हळूहळू कमी होत आहे. एवढेच नाही तर या सर्व बाबींमुळे केसांच्या आरोग्याला खूप नुकसान होते.
अशा परिस्थितीत जर तुम्ही केसांना जास्त वेळ देऊ शकत नसाल तर आठवड्यातून किमान 2 दिवस तेल लावा. पण केसांना फक्त तेल लावणे पुरेसे नाही. केसांच्या टेक्सचर नूसार योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने तेल लावल्यास त्याचा फायदा होतो. म्हणून आम्ही अशाच काही हेअर ऑइलची नावे घेऊन आलो आहोत, जे महत्त्वपूर्ण पोषक तत्वांनी युक्त आहेत, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात तसेच केसांशी संबंधित इतर समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात.
केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी निरोगी तेल :
खोबरेल तेल
खोबरेल तेल अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-फंगल असल्यामुळं खोबरेल तेल हिवाळ्यात होणार्या कोंड्यासारख्या समस्या दूर करतं. हे आपल्या केसांचा ओलावा आणि चमकदेखील टिकवून ठेवतं. केसांच्या आरोग्यासाठी हे तेल खूप पूर्वीपासून वापरलं जात आहे. आयुर्वेदातही खोबरेल तेलाचे गुणधर्म सांगितले आहेत. कोमट खोबरेल तेलानं केसांच्या मुळांची मालिश केल्यानं केस मजबूत आणि मुलायम राहतात. म्हणूनच केसांना कोरडेपणा आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी खोबरेल तेल सर्वोत्तम मानलं जातं.
अल्मन्ड हेअर ऑईल
अल्मन्ड ऑईल हे व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. हे सर्व पोषक घटक केसांच्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहेत. व्हिटॅमिन ए ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करते. त्याच वेळी, त्यात असलेले व्हिटॅमिन बी 7 बायोटिन म्हणून ओळखले जाते, ते केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
ऑलिव्ह तेल
ऑलिव्ह तेल बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असलेल्या ऑलिव्ह ऑइलमध्ये सर्व प्रकारची चांगल्या फॅटी अॅसिडस आणि व्हिटॅमिन-ई देखील आढळतात. त्यामुळं मालिश केल्यावर केसांच्या मुळांना विशेष पोषण मिळतं आणि ती सुरक्षित राहतात. यामध्ये आढळणारं ओलेइक अॅसिड केसांमधील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी विशेष भूमिका बजावतं. त्यामुळं ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्यास विशेषतः हिवाळ्यात केसांचा कोरडेपणा किंवा कोंडा आणि केस तुटण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
तिळाचे तेल
तिळाचे केसांचे तेल हे व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. केसांच्या समस्यांवर औषधी बनवण्यासाठी आयुर्वेदात अनेक वर्षांपासून तिळाचे तेल वापरले जात आहे. तिळाच्या बियापासून बनवलेले हे तेल केसांच्या वाढीस चालना देते आणि पुन्हा वाढीसाठी देखील खूप फायदेशीर आहे. यासोबतच ते गरम करून लावा, यामुळे स्कॅल्प निरोगी राहते आणि कोंडासारख्या समस्यांवरही ते प्रभावी ठरते.
एरंडेल तेल
कोरड्या आणि खराब झालेल्या केसांसाठी एरंडेल तेल खूप फायदेशीर आहे. हे तेल घट्ट व चिकट असते, त्यामुळे तेल लावल्यानंतर केस चांगले शॅम्पू करून पाण्याने चांगले धुवावेत, त्यामुळे टाळू तेलकट राहत नाही. केस खूप कोरडे असल्यास एक चमचा एरंडेल तेलात एक चमचा खोबरेल तेल मिसळा. ते गरम करा व केसांवर आणि टाळुंवर लावा. तेल लावल्यानंतर हातांनी डोक्याला मसाज कारा. तसेत केसांना लावलेले तेल रात्रभर राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी हर्बल शैम्पूने केस स्वच्छ धुवा.
भृंगराज तेल
भृंगराज ही आयुर्वेदाने मान्यता दिलेल्या औषधी वनस्पतींपैकी एक आहे. केस वाढवण्यासोबतच त्यांना मुळांपासून मजबूत करते. तीळ, खोबरे, आवळा, ब्राह्मी इत्यादी कोणत्याही तेलात भृंगराज तेल मिसळून लावल्यास अधिक फायदा होतो.