Thursday, April 25, 2024
घरमानिनीBeautyBeauty Tips : उन्हाळ्यात त्वचा फ्रेश ठेवण्यासाठी घरीच बनवा 'फेस स्प्रे'

Beauty Tips : उन्हाळ्यात त्वचा फ्रेश ठेवण्यासाठी घरीच बनवा ‘फेस स्प्रे’

Subscribe

उन्हाळ्यात अनेकदा घामाने चेहरा निस्तेज होतो. अशावेळी त्वचेला तजेलदार आणि फ्रेश ठेवण्यासाठी चेहऱ्यावर स्प्रेचा वापर करणं हा चांगला पर्याय मानला जातो. सध्या बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फेस स्प्रे उपलब्ध आहेत. परंतु, तुम्ही तुमच्या स्किन टोन त्यानुसार किंवा नेचुरल गोष्टींच्या मदतीने घराच्या घरी स्प्रे बनवू शकता.

काकडीचा फेस स्प्रे 

DIY Cucumber Mint Face Mist | Distillata

- Advertisement -

साहित्य : 

  • एक काकडी
  • 1 चमचा एलोवेरा जेल
  • पाणी
  • बाटली

कृती : 

- Advertisement -
  • सर्वप्रथम काकडी नीट धुवून त्यांचा किसून करून घ्या आणि यानंतर त्याचा सर्व रस काढा.
  • आता हा रस एका बाटलीत भरून घ्या.
  • काकडीच्या रसात एलोवेरा जेल आणि पाणी टाकून एकत्र करून घ्या.
  • बाटली नीट हलवा म्हणजे सर्वकाही व्यवस्थित मिसळले जाईल.
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या फेस स्प्रेमध्ये लिंबाचा रस देखील वापरू शकता.
  • तुमची त्वचा ताजेतवाने ठेवण्यासाठी हा तुमचा फेस स्प्रे तयार आहे.

ग्रीन टीचा फेस स्प्रे 

Homemade Facial Spray With Green Tea And Cucumber Against, 60% OFF

 

साहित्य :

  • ग्रीन टी
  • टी ट्री ऑयल
  • पाणी

कृती :

  • दीड कप ग्रीन टी 5 मिनिटे भिजण्यासाठी ठेवा.
  • आता रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
  • यात ग्रीन टीमध्ये टी ट्री ऑइलचे चार थेंब टाका.

ग्रीन टी स्प्रेचे फायदे

  • ग्रीन टीच्या वापराने त्वचा ताजेतवाने आणि चमकदार दिसते.
  • ग्रीन टी चेहऱ्यावर लावल्याने मुरुमांचा त्रास होत नाही.
  • जर तुमची त्वचा उष्णतेमुळे टॅन झाली असेल तर हा स्प्रे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

 

गुलाब पाण्याचा फेस स्प्रे 

Rose Water Benefits for Your Overall Well-Being - HealthKart

 साहित्य :

  • गुलाब पाणी
  • सादे पाणी

कृती : 

  • गुलाब पाणी आणि सादे पाणी एका बाटलीत टाकून मिक्स करून घ्या.
  • यानंतर ही बाटली फ्रीजमध्ये ठेवा
  • यानंतर गुलाब पाणी फेस स्प्रे म्हणून वापरू शकतो.

फेस स्प्रेचे फायदे

  • चेहऱ्यावरील मोठे छिद्र कमी करण्यास मदत करतात. मेकअप व्यतिरिक्त, आपण नैसर्गिक मार्गाने छिद्रांचा आकार कमी करू शकता. गुलाब पाण्याच्या वापराने चेहऱ्यावरील छिद्र कमी होतात.
  • चेहरा हायड्रेट ठेवण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर आहे. त्याच्या वापराने त्वचा ओलसर राहते.
  • सुजलेले डोळे कमी करण्यासाठी तुम्ही गुलाबजल देखील वापरू शकता. गुलाबपाणी थंड असते, ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
  • जर तुमच्याकडे मेकअप रिमूव्हर नसेल तर तुम्ही गुलाब पाण्याच्या मदतीने मेकअप साफ करू शकता.

हेही वाचा :

Beauty Tips : ओठांवर मुरूमं येत असतील तर करा हे सोपे उपाय

- Advertisment -

Manini