Friday, February 23, 2024
घरमानिनीBeautyहिवाळ्यात बनवा वेगन हेअरमास्क

हिवाळ्यात बनवा वेगन हेअरमास्क

Subscribe

हिवाळ्यात केसांना कोरड्या आणि निर्जीव केसांच्या समस्येला नेहमी सामोरे जावे लागते. तसेच हिवाळ्यातल्या थंड वाऱ्यामुळे टाळूचा ओलावा नाहीसा होतो. यासोबतच आपण थंडीत कानटोप्या किंवा शॉल वापरतो. पण यामुळे आपल्या केसांना किंवा टाळूला याच्या कापडाचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच, हिवाळ्यात केसांची जास्त काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच यासाठी योग्य हेअर मास्क वापरणे योग्य ठरेल. हेअर मास्क केसांना केवळ पोषण देत नाहीत तर केसांना रेशमी आणि चमकदार ठेवायला देखील मदत करतात. अशातच केसांसाठी तुम्ही घरी वेगन हेअर मास्क बनवू शकतात आणि हा हेअर मास्क तुम्ही थंडीत केसांना लावू शकता.

केळी आणि बदाम तेलाने मास्क बनवा

जर थंडीच्या दिवसात तुमचे केस कोरडे आणि निर्जीव दिसत असतील तर केळी आणि बदामाच्या तेलाने घरच्या घरी वेगन मास्क तुम्ही बनवू शकता. तसेच केळी केसांना मॉइश्चरायझ करतात आणि मऊ सुद्धा ठेवतात. यासोबतच बदाम तेल हे केसांना कंडिशनिंग करण्यास चांगली मदत करतात. जर तुमचे केस खूप खराब झाले असतील तर तुम्ही या मास्कमध्ये एक चमचा एलोवेरा जेल देखील घालू शकता. आता आपण पाहुयात वेगन हेअरमास्क कसा बनवायचा…

- Advertisement -

Share 145+ banana honey hair mask latest - tnbvietnam.edu.vn

साहित्य

  • 1 पिकलेले केळे
  • 2 चमचे बदाम तेल

कृती

  • सर्वप्रथम, चमच्या मदतीने केळी मॅश करा.
  • आता त्यात बदामाचे तेल मिसळा.
  • ही पेस्ट लावताना केस दोन्ही बाजूला करून घ्या.
  • यानंतर हळुवारपणे ही पेस्ट सगळ्या केसाला लावून घ्या.
  • तसेच ही पेस्ट 20 मिनिटे अशीच राहू द्या.
  • पेस्ट लावून झाल्यांनतर कोमट पाण्याने केस स्वच्छ करा आणि नंतर केसांना सॉफ्ट शॅम्पू लावा.
  • यानंतर केस चांगले धुवून घ्या.

________________________________________________________________________

हेही वाचा : सुंदर दिसण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचा वापर

- Advertisment -

Manini