लिपस्टिक हा मुलींचा खूप जवळचा आणि आवडीचा विषय आहे. अशातच आजकाल बहुतेक मुलींना मॅट लिपस्टिक लावायला आवडते. तसेच लिपस्टिकचे अनेक रंग आहेत जे मुलींना जास्त आवडतात. आणि असे काही रंग आहेत जे बहुतेक मुलींना आवडत नाहीत. पण जरा का तुम्ही पाहिलं तर हल्ली बहुतेक मुलींना मॅट आणि ग्लॉसी लिपस्टिक लावायला जास्त आवडते. तसेच आजकाल मार्केटमध्ये ट्रेंडी आणि सुटेबल अशा वेगवेगळ्या कलरच्या लिपस्टिक आपल्याला पाहायला मिळतात. जो रंग आपल्या स्किनटोनला मॅच होईल असा रंग आपण निवडावा. जेणेकरून तो आपल्या फेसटोनला अगदी शोभून दिसेल.
वॉर्म ब्राउन कलर मॅट लिपस्टिक
जर तुम्हाला काही वॉर्म शेड असलेली लिपस्टिक वापरायची असेल आणि ज्यामध्ये तुमचे ओठ आकर्षक दिसायला हवे असतील तर तुम्ही वॉर्म ब्राउन कलर मैट लिपस्टिक वापरू शकता. तसेच या प्रकारची लिपस्टिक ही गोऱ्या स्किनटोनच्या मुलींवर छान दिसते. या लिपस्टिकची खास गोष्ट म्हणजे तुम्ही या लिपस्टिकला कोणत्याही आउटफिट कलरसोबत मॅच करू शकता. तसेच ऑफिससाठीही हा लिपस्टिकचा रंग हा उत्तम पर्याय आहे. अशातच तुम्ही लिपस्टिकचा हा प्रकार ऑनलाइन आणि बाजारातून देखील विकत घेऊ शकता. ही लिपस्टिक लावल्यावर तुमचा लूक खूप वेगळा वाटेल.
न्यूड पिंक शेड मॅट लिपस्टिक
पिंक रंग हा बहुतेक मुलींना जास्त आवडतो. तसेच या रंगाच्या बऱ्याच न्यूड शेड या लिपस्टिकमध्ये उपलब्ध आहेत. जर का तुम्ही पार्टी किंवा ऑफिस लूक करत असाल तर तुम्हाला या रंगाच्या अनेक शेड्स वापरायला मिळतील. पिंक न्यूड लिपस्टिक ही सॉफ्ट आणि शाईन करणारी असते. ज्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल लूक हवा तसा करता येईल. पिंक न्यूड शेड्स तुम्हाला मार्केट्समध्ये हव्या त्या रंगात मिळतील तसेच पिंक हा शेड खूप ग्लॉसी आणि मॅटमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. या रंगाची लिपस्टिक बहुतेक सर्वांवरच शोभून दिसते.
रूबी रेड मॅट लिपस्टिक
जर का तुम्हाला लिपस्टिकमध्ये रेड रंग आवडत असेल तर तुम्ही रूबी रेड मॅट लिपस्टिक नक्की ट्राय करा. ही लिपस्टिक लावल्यामुळे तुम्हाला एक बोल्ड लूक मिळेल. या प्रकारच्या लाल रंगाच्या शेड्स तुमच्या पार्टी लुकसाठी उत्तम पर्याय आहेत. तसेच या लिपस्टिकची खास गोष्ट म्हणजे प्रत्येक स्किन टोनच्या मुली या कलरच्या लिपस्टिक लावू शकतात. तसेच या व्यतिरिक्त रूबी रेड मॅट लिपस्टिकमध्ये थोडे लाईट आणि डार्क शेड्स तुम्हाला सहज मार्केटमध्ये उपलब्ध होतील.
अशातच या सर्व प्रकारच्या लिपस्टिक शेडमुळे तुमचा लूक परफेक्ट होईल. आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या मेकअप किटमध्ये या शेडच्या लिपस्टिक नक्की कॅर्री करा. तसेच या लिप्सशेड्स जास्त काळ टिकणाऱ्या आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.