Thursday, April 25, 2024
घरमानिनीBeautyकेस गळतीवर वापरा 'हे' तेल

केस गळतीवर वापरा ‘हे’ तेल

Subscribe

केस हे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढविते. यामुळे तुम्हाला केसांना हेल्दी ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु, वातावरणातील बदल, लायफ स्टायल आणि चुकीचे हेअर केअर प्रोडक्ट्समुळे तुमच्या केस गळण्याच्या (Hair Loss) समस्या गंभीर होऊ शकतात. केस गळतीच्या समस्येवर बाजारात अनेक एंटी हेअर फॉल शॅम्पू उपलब्ध आहेत. पण, हे शॅम्पू देखील केस गळतीच्या समस्येवर काम करत नाहीत. केस गळतीवर तेल हाच एक रामबाण उपाय आहे. आज आम्ही तुम्हाला घरीच तेल कसे बनवायचे हे सांगणार आहोत. या तेलांच्या वापरामुळे तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होणार आहेत.

- Advertisement -

 

कढीपत्त्याचे तेल

केस गळतीवर कढीपत्त्याचे तेल हे खूप फायदेशीर ठरते. हे कढीपत्त्याचे तेल तुम्ही घरी देखील बनवू शकता. हे तेल वापरल्याने तुम्हाचे केस गळती नक्कीच कमी होईल.

- Advertisement -

 

 साहित्य

  • 4-5 चमचे खोबरेल तेल
  • 1 मुठ कढीपत्ता

कृती

  • एका भांड्यात 4-5 चमचे खोबरेल तेल टाका आणि ते गरम होण्यासाठी ठेवा
  • 1 मुठ कढीपत्त्याची पाने टाका
  • तेल चांगले गरम होऊ द्यावे
  • काही वेळाने तेलाचा रंग बदलू लागेल
  • यानंतर गॅस बंद करा आणि तेल थंड होण्यासाठी ठेवू द्यावे
  • काचेच्या बॉटलमध्ये हे तेल ठेवू द्या.

तेलाचा असा करा वापर

  • केस धुण्यापूर्वी आणि आठवड्यातून 2-3 वेळा या तेलचा वापर करा
  • हे तेल केसांच्या मुळाला लावा
  • 3-5 मिनिटमध्ये केसाना मसाज करा
  • यानंतर केस धुवून घ्या

जास्वंदचा तेल कसे बनवावे

जास्वंदाचे तेल हे केसांसाठी वरदान मानले जाते. या तेलाच्या वापराने केसांच्या सर्व समस्या दूर होतात.

साहित्य

  • जास्वंदाचे फूल
  • 4-5 खोबरेल तेल

 

कृती

  • सर्वप्रथम जास्वंदाचे फूल स्वच्छ धुवून घ्या, कारण फुलावरील सर्व घान साफ करून घ्यावे.
  • मिक्सरमध्ये फुलाला वाटून पेस्ट करू घ्या
  • यानंतर एका पातेल्यात 4-5 खोबरेल तेल घ्या
  • खोबरेल तेल आणि जास्वंदाचे फुलाची पेस्ट टाकून गरम करून घ्या
  • तेल चांगले गरम करा
  • आता गॅस बंद करून घ्या आणि तेल थंड करु घ्या.
  • तेल चाळणीने गाळून घ्या आणि एका बॉटलमध्ये ठेवा

तेल केस वापरावे

  • अंघोळीपूर्वी हे तेल केसांना लावा
  • केसांना हे तेल अर्धा तास ठेवून द्यावे
  • आता केस शॅम्पूने धुवून घ्या

असे करा हेअर केअर

  • केसांना निरोगी ठेवण्यासाठी केस धुणे गरजेचे असते. आठवड्यातून दोन वेळा केस धुवून घ्या.
  • केसांना तेल लावणे विसरू नका, तेल लावल्याने केसांना पोषण मिळते. तेल लावल्याने केस मजबूत होतात.
  • केसांमध्ये घरगुती हेअर मास्क लावावे. हेअर मास्क तुमच्या केसांना चांगला फायदा देतो. पण, हे हेअर मास्क तुमच्या केसांच्या कंडीशननुसार असले पाहिजे.

हेही वाचा – हेल्दी केसांसाठी बटाटा आहे फायदेशीर; असा करा वापर

- Advertisment -

Manini