हरतालिका तृतीयेला स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. हे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वात कठिण असल्याचे मानले गेले आहे कारण या दिवशी पाणी देखील पिऊ नये अशी पद्धत आहे. अविवाहित मुली देखील इच्छित वर प्राप्तीसाठी हा व्रत करतात. या दिवशी सुंदर तयार होऊन महादेवाची आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते.
यंदा १८ सप्टेंबर रोजी हरतालिका साजरी होत आहे. विवाहित महिलांप्रमाणेच कुमारिका मुली सुद्धा या सणाला महादेवाचे पूजन करतात. या दिवशी महिला सुंदर तयार होऊन एकत्र पूजा करतात. या खास प्रसंगासाठी मुली आणि महिला आउटफिटपासून मेकअप पर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतात. तुम्हाला या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर चमक हवी असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेची आतापासून काळजी घ्यायला हवी. यासाठी तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींनी हरतालिका स्पेशल फेशियल करू शकता. आपण देखील या खास दिवशी सुंदर दिसू इच्छित असाल तर हे सोपे मेकअप टिप्स तुमच्यासाठी आहेत.
हेअरस्टाईल
तुमच्या केसानुसार तुम्ही साडीवर हेअरस्टाईल करू शकता. जर का तुम्हाला हेअरस्टाईल येत नसेल तर हेअर बन्स वापरा. तसेच तुम्हाला कोणती स्टाईल करायची असेल तर हेअर एक्सटेंशन वापरा. ज्यामुळे केसाला एक नवीन लूक मिळेल. तसेच तुम्हाला फॅन्सी लूक हवा असेल तर तुम्ही केसांना कर्ल्स किंवा हेअर स्ट्रेटनरने देखील केसाला स्टाईल करू शकता.
मेहंदी
हरतालिकेच्या दिवशी महिलांनी मेहंदी काढणे शुभ मानलं जात. ज्या महिलेचं नवीन लग्न झाले आहे त्यांनी आवर्जून मेहंदी काढावी. यामुळे एक छान लूक मिळेल. तसेच मेहंदीमूळे हाताची शोभा वाढते. महत्वाचे म्हणजे भारतीय संस्कृती नुसार सणाला मेहंदी काढणे चांगले असून याचा प्रभाव आपल्यावर होत असतो.
क्लीन्झर
मेकअप करण्याअगोदर सर्वात आधी चेहरा चांगला क्लीन्जरने स्वच्छ करून घ्यावा. त्यामुळे मेकअपचा बेस चांगला बसतो. तसेच चेहरा क्लीन्झरने साफ केल्यामुळे डेड स्किन निघून जाते आणि चेहरा तजेलदार दिसतो.
टोनर
चेहऱ्यावर जर का पुरळ किंवा कोणते डाग असतील तर टोनर लावल्यामुळे ते जास्त दिसत नाहीत. तसेच चेहऱ्याचा टोन सुधारतो. टोनर वापरताना चांगल्या कंपनीचा टोनर वापरा ज्यामुळे चेहऱ्यावरचा मेकअप उठून दिसेल आणि मेकअपचा बेस चांगल्या राहण्यासाठी याची मदत होईल.
फाऊंडेशन
फाऊंडेशन वापरताना तुमचा चेहरा कोणत्या स्किन टोनमध्ये बसतो हे एकदा तपासून पहा. आणि त्यानुसारच स्किनला तसेच फाऊंडेशन लावा. फाऊंडेशन खरेदी करताना चांगल्या ब्रँडचे फाऊंडेशन वापरा. कधीही डायरेक्ट फाऊंडेशन अप्लाय करू नका. बेस लावल्यानंतर मगच फाऊंडेशन लावा.
लिपस्टिक
मेकअप मधला सर्वात महत्वचा भाग म्हणजे लिपस्टिक आहे. लिपस्टिक लावताना मिक्स कलरची लिपस्टिक लावा. तसेच साड्यांवर लिपस्टिक लावताना काँट्रास रंगाची लिपस्टिक वापरा. यामुळे चेहरा उठून दिसेल. तसेच लिपस्टिक लावताना लिप लायनर थोडे जाड लावा. कारण लिपस्टिक लावताना कोणतीही अडचण येणार नाही.
________________________________________________________________________
हेही वाचा : चेहरा उजळ दिसण्यासाठी बटाट्याचा ‘या’ 5 प्रकारे करा वापर