Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Beauty शॅम्पूच्या मदतीने घरच्या घरीच करा Manicure

शॅम्पूच्या मदतीने घरच्या घरीच करा Manicure

Subscribe

सुंदर आणि लांब नखांसाठी वेळोवेळी नखांची काळजी घेणे फार गरजेचे असते हे आपल्या सर्वांनाच माहिती असते. नखांची काळजी करण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन मॅनीक्योर करतो आणि यासाठी खुप खर्च ही करतो. पण असे मॅनीक्योर फार काळ टिकत नाही. मात्र तुम्ही घरच्या घरी मॅनीक्युअर करु शकता. ते कसे करावे याच्याच काही टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

- Advertisement -

मॅनीक्योर करण्याची पद्धत
-सर्वात प्रथम एका बाउलमध्ये कोमट गरम पाणी घ्या आणि आपले हात त्यात थोडावेळ बुडवून ठेवा
-जवळजवळ 15-20 मिनिटांपर्यंत हात तसेच राहू द्या. त्यानंतर टॉवेलने हात पुसा आणि नखं ही कोरडी करा
-आता तुम्ही एका बाउलमध्ये कोमट गरम पाणी घ्या आणि त्यात जवळजवळ 1-2 शॅम्पूचे पॅकेट्स कापून टाका.
-आता शॅम्पू टाकलेल्या बाउलमध्ये आपले हात बुडवून ठेवा आणि घरातील एखाद्या जुन्या ब्रशच्या मदतीने नखं स्वच्छ करा.
-जवळजवळ 10-15 मिनिट नखं स्वच्छ करत रहा आणि हात पाण्यातून आता बाहेर काढून पुन्हा टॉवेलने पुसून घ्या.
-स्वच्छ केल्यानंतर तुम्ही नेल फाइलरच्या मदतीने नखांना शेप द्या. त्याचसोबत क्युटीक्लस सुद्धा कापा.
-त्यानंतर तुम्ही नेल रिमुव्हरच्या मदतीने नखांवरील नेल पेंट काढा.
-आता हॅन्ड क्रिम किंवा मॉइस्चराइजरच्या मदतीने नख आणि हातांना मॉइस्चराइज करा
-अशा प्रकारे तुम्ही आठवड्यात 2 वेळा मॅनीक्योर करु शकता.

या गोष्टींची घ्या काळजी
-नखांना शेप देणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन ते वेडेवाकडे वाढू नयेत आणि परफेक्ट शेपमध्ये वाढावेत
-दररोज हॅन्ड क्रिम किंवा उत्तम मॉइस्चराइजरचा वापर करा
-नखं कोरडी होण्यापासून दूर राहण्यासठी नारळाचे तेल हाताला आणि नखांना लावून मसाज करा.


- Advertisement -

हेही वाचा- सनस्क्रिनच्या चुकीच्या वापरामुळे होतील ‘या’ समस्या

- Advertisment -

Manini