Wednesday, February 28, 2024
घरमानिनीBeautyLip Care : ओठ कोरडे झालेत, करा 'हे' घरगुती उपाय

Lip Care : ओठ कोरडे झालेत, करा ‘हे’ घरगुती उपाय

Subscribe

वातावरणात सतत बदल होत असतात. कधी पाऊस, कधी गारवा तर कधी कडक ऊन. या बदलणाऱ्या वातावरणाचा तुमच्या त्वचेवर परिणाम होत असतो. हिवाळ्यातील थंड वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम होतो तो तुमच्या नाजूक आणि मुलायम ओठांवर. कारण ओठांची त्वचा ही इतर त्वचेपेक्षा जास्त कोमल आणि नाजूक असते.
हिवाळ्यात थंडी वाढत जाते तशी त्वचा कोरडी पडू लागते. ओठही कोरडे होतात, हळू हळू ते ओठ फाटू लागतात. अगदी त्यातून रक्तही येऊ लागते. असे फाटलेले ओठ तुमचे सौंदर्य देखील खराब करतात. थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्वचेवर भेगा पडणे, ओठ फाटणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही यावर काही घरगुती उपाय करू शकता. तुमच्या फाटलेल्या ओठांना कसं वाचवायचे याबद्दल जाणून घेऊयात.

मध
मधाची कंसिसटंसी घट्ट व चिकट असते. मध तुमच्या ओठाला नैसर्गिकरीत्या मुलायम ठेवण्यासाठी मदत करतो. मधाचा पातळ थर तुमच्या ओठांवर लावा आणि काही मिनिटांनंतर तो कोमट पाण्याने धुऊन टाका. त्यामुळे ओठांच्या त्वचेची साले निघणार नाहीत आणि तुमचे ओठ मऊ राहण्यास मदत होते.

- Advertisement -

गुलाबाच्या पाकळ्यांचा लेप
गुलाब, गुलाबाच्या पाकळ्यांचा रस अथवा गुलाबपाणी तुम्ही तुमच्या सौंदर्य वाढवण्यासाठी वापरू शकता. पाच ते सहा गुलाबाच्या पाकळ्या आणि दोन चमचे कच्च दूध घ्या. दूधामध्ये गुलाबाच्या पाकळ्या बुडवून ठेवा. हे मिश्रण वाटून घ्या आणि ते मिश्रण तुमच्या ओठांवर लावा. 20 मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

एलोवेरा जेल
एलोवेरा जेल मध्ये अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म आहेत. म्हणूनच डेंटिस्ट कोरडे ओठ, हिरड्यांच्या रोगांवर उपचार करण्यासाठी ते लावण्याचा सल्ला देतात. एलोवेरा जेलमधील एन्झाइम्समध्ये सौम्य एक्सफोलिएटिंग एजंट असतात. हे डेड स्किन काढून टाकण्यास उपयुक्त आहे. ते लावण्यासाठी तुम्ही फ्रेश एलोवेराचा म्हणजेच कोरफडचा वापर करु शकता. कोरफडच्या पानातून गर काढा. नंतर ते ओठांवर लावून चोळा. ओठांना हायड्रेट करण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल मर्यादित प्रमाणात वापरावे. कारण त्यात पीलिंग गुणधर्म आहेत.

- Advertisement -

बीट ज्यूस
रोज ओठांवर बीटाचा रस लावल्याने ओठांचा रंग गुलाबी होईल आणि त्यात मध मिसळून लावल्यास ते लिप मास्कचे काम करेल. 15 मिनिटे ओठांवर ठेवा आणि नंतर धुवा. तुमचे ओठ मऊ आणि गुलाबी होतील.

शुगर स्क्रब
हा एक जुना आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे. यासाठी ओठांवर साचलेली मृत त्वचा काढून टाका. यासाठी अर्धा चमचा साखरेत खोबरेल तेल मिसळा. आता ते मिक्स करून बोटांच्या मदतीने ओठांवर चोळा. याने ओ नरम होतील आणि डेड स्किन निघून जाईल.

- Advertisment -

Manini