Friday, January 17, 2025
HomeमानिनीBeautyहातांच्या कोपरांचा काळेपणा 'असा' करा दूर

हातांच्या कोपरांचा काळेपणा ‘असा’ करा दूर

Subscribe

चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी आपण अनेकदा विविध उपाय करत असतो. पण चेहऱ्यासोबत इतर अवयवांचे सौंदर्य अबाधित ठेवणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे असते. बहुतेकदा आपण हातांचे कोपरे साफ करायला विसरतो किंवा त्याकडे दुर्लक्ष तरी होते. त्यामुळे कोपरांवर काळेपणा साचतो आणि कोपर काळे दिसू लागतात. जेव्हा आपण शॉर्ट्स स्लिव्हस हातांचे कपडे घालतो तेव्हा हातांच्या कोपरांचा काळेपणा लगेचच दिसून येतो. त्यामुळे चेहऱ्याप्रमाणेच हातांचे सौंदर्य राखण्यासाठी हातांच्या कोपरांचा काळेपणा दूर करणे महत्वाचे आहे.

कोरफड
कोरफडमध्ये अँटीसेफ्टीक, अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीइंफ्लेमेटरी घटक असतात. ज्याच्या मदतीने त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे हातांच्या कोपरांना आलेला काळेपणा दूर करण्यासाठी कोरफड उपयोगी पडते.

कसे वापराल –

  • सुरीच्या मदतीने कोरफडीचा गर काढून घ्या.
  • काढलेला कोरफडीचा गर काळया झालेल्या भागावर लावा.
  • यानंतर कोरडे करून घ्या.
  • 10 मिनिटानंतर हात कोमट पाण्याने धुवून घ्या.
  • हात स्वच्छ पुसून झाल्यावर त्यावर स्किनकेअर क्रीम लावा किंवा कोणतेही मॉइश्चराझर तुम्ही लावू शकता.
  • ही प्रक्रिया आठवड्यातून 2 ते 3 वेळा अवश्य करा फरक जाणवेल.

लिंबू –
कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू फार उपयुक्त ठरतो. लिंबाचा पोटँशियम, कॅल्शिअम आणि फायबर असतात. या घटकांमुळे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत मिळते.

कसे वापराल –

  • लिंबू कापून त्याचा रस न काढता कोपरावर चोळा.
  • लिंबू लावण्यानंतर 10 ते 15 मिनिटे तसेच राहूद्या.
  • कोरडे झाल्यानंतर हात कोमट पाण्याने धुवून घ्या.
  • धुतल्यानंतर हातांना मॉइश्चरायझर लावा.
  • ही क्रिया आठवड्यातून 2 वेळा अवश्य करा. तुम्हाला फरक जाणवेल.

बटाटा –
कोपराच्या काळेपणाचीसमस्या बटाट्याने दूर होऊ शकते. बटाट्यातील गुणधर्मामुळे हातांच्या कोपरांचा काळेपणा दूर होण्यास मदत होते.

कसे वापराल-

  • बटाटा सोलून त्याचा रस काढून घ्या.
  • बटाट्याचा काढलेला रस हातांच्या कोपरांवर चोळून घ्या.
  • 10 ते 15 मिनिटांनी कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने हात स्वच धुवून घ्या.
  • यानंतर हातांना मॉइश्चरायझर अवश्य लावा.
  • हा उपाय सतत करत राहा काही दिवसातच तुम्हाला हातांच्या कोपरांमध्ये फरक जाणवेल.

 

 

 


हेही वाचा : सनटॅनवर ‘हे’ आहेत आयुर्वेदिक उपाय

 

Manini