शहनाज हुसैन या भारतातील प्रसिद्ध सौंदर्य आणि केसांची निगा राखणाऱ्या तज्ञांपैकी एक आहेत. एवढेच नाही तर त्या ‘शहनाज हुसैन ग्रुप’च्या अध्यक्षा, संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. शहनाज हुसेनची अनेक हर्बल उत्पादने तुम्हाला बाजारात सहज मिळतील. सौंदर्य क्षेत्रात आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.
आता सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत आणि या दिवसात प्रत्येकाला छान दिसावस नेहमीच वाटत. सौंदर्य तज्ज्ञ यांनी काही महत्त्वाच्या स्किन केअर टिप्स शेअर केल्या आहेत, ज्याच्या मदतीने आपण चेहऱ्यावरील हरवलेली चमक परत आणू शकतो आणि चमकदार त्वचा मिळवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या टिप्स…
- चेहऱ्याच्या त्वचेवर फळांच्या मदतीने फेस पॅक बनवता येतो.
- हयासाठी एका भांड्यात केळी, सफरचंद, पपई, एवोकॅडो आणि संत्र्याचा रस एकत्र ठेवा, मॅश करा आणि एकत्र करा.
- केळी मुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते तर पपई त्वचेला आतून साफ करण्यास मदत करते.
- सफरचंद आणि संत्र्यामध्ये असलेली खनिजे आणि जीवनसत्त्वे मिसळून अॅव्होकॅडो त्वचेला संपूर्ण हायड्रेशन प्रदान करण्यास मदत करेल.
- सूर्यापासून त्वचेचे रक्षण करा आणि नियमित चेहरा धुवत राहा.
- दर आठवड्याला स्किन केअर रूटीन फॉलो करा.
- कोरड्या त्वचेला क्लिन्झिंग क्रीम किंवा जेलची आवश्यकता असते.
- तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचेसाठी हलके क्लिन्झिंग मिल्क आणि लोशन चांगले असते.
- तसेच ज्यांच्या चेहऱ्यावर मुरुम आहेत त्यांनी चेहऱ्याला औषधी क्लीन्सर वापरा.
_________________________________________________________________________