आपण हल्ली बघतो जेव्हा जेव्हा वातावरणात बदल होतात तेव्हा तेव्हा आपला चेहरा निस्तेज दिसू लागतो. अशातच चेहऱ्याला आपण अनेकदा कॉस्टमॅटिकस प्रॉडक्ट्स वापरतो. ज्यामुळे आपला चेहरा लगेच खराब होतो. मेकअपमध्ये असेलेले केमिकल्स तुमच्या चेहऱ्यावर अगदी सहजपणे मिसळतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येणे,चेहरा डल दिसणे हे सर्व प्रकार आपल्याला दिसून येतात.
अशावेळी आपण अनेक प्रॉडक्ट्स वापरून बघतो. पण त्याचा काहीच उपयोग आपल्याला होताना दिसत नाही. अशातच आयुर्वेदानुसार कडुलिंबाची पाने तुमच्या त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करू शकतात. त्यामुळे स्किन केअर रूटीनमध्ये कडुलिंबाच्या पानांचा समावेश केल्याने तुमचा चेहरा अगदी चांगल्या प्रकारे टोन होऊ शकतो.
कडुलिंबाच्या पानांमुळे त्वचेला ‘हे’ फायदे मिळतात
- कडुलिंबाच्या पानांमध्ये उत्कृष्ट अनिऑक्सिसिडंट, अँटीफंगल पदार्थ असतात जे आपल्या निस्तेज त्वचेसाठी फायदेशीर आहे.
- कडुनिंबातील अनेक घटक हे त्वचेच्या अनेक संक्रमणांशी लढू शकतात.
- तसेच कडुलिंबामध्ये असलेले फॅटी ऍसिडस्, जीवनसत्त्व आणि खनिजे यांचा उत्तम स्रोत आहे जे निरोगी त्वचेसाठी आवश्यक आहे.
- याव्यतिरिक्त, कडुनिंबात निंबिडिन, निम्बोलाईड आणि अझाडिराक्टिन सारखे सक्रिय घटक असतात.
- जे त्वचेच्या अनेक समस्यांपासून आपल्याला दूर ठेवतात.
- एवढेच नाही तर सुरकुत्या, बारीक रेषा कमी करण्यासाठी आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी देखील कडुलिंबाची पाने उत्तम मनाली जातात.
कडुलिंबाच्या पानांनी घरच्या घरी फेसवॉश कसा बनवायचा
कडुनिंबाची पाने सुकवून तुम्ही घरीच फेसवॉश बनवू शकता. याचा रोज वापर केल्याने चेहराही स्वच्छ होईल आणि त्वचाही चमकू लागेल.
कडुलिंबाचा फेस वॉश बनवण्यासाठी साहित्य-
- 2 चमचे कडुलिंब पावडर
- 1/2 टीस्पून हळद पावडर
- 1 टीस्पून गुलाब पाणी
- 1 टीस्पून एलोवेरा जेल
कडुलिंबाचा फेस वॉश बनवण्याची पद्धत-
- सर्वप्रथम कडुलिंबाची पाने उन्हात वाळवून त्याची पावडर बनवा.
- यानंतर, सर्व साहित्य एका भांड्यात ठेवा आणि ते चांगले मिसळा.
- हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. यानंतर चेहरा पाण्याने धुवून कोरडा करा.
- तुम्ही हे मिश्रण जास्त प्रमाणात बनवू ठेवू शकतात आणि हे मिश्रण 4-5 दिवस वापरू शकता.
- याने रोज चेहरा धुतल्याने काही दिवसातच तुम्हाला फरक दिसेल.