Thursday, February 22, 2024
घरमानिनीBeautyरात्री झोपण्यापूर्वी 'अशी' घ्या त्वचेची काळजी

रात्री झोपण्यापूर्वी ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी

Subscribe

त्वचा चमकदार दिसण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरतो. पण बर्‍याच वेळा असे होते की त्वचा ही समान राहावी आणि सुंदर दिसावी यासाठी आपण महागडे औषधे आणि प्रॉडक्ट्स घेतो. पण याचा काहीच फायदा होत नाही. तसेच रात्रीच्या वेळी अशा काही गोष्टींचा वापर केल्यास तुमची त्वचा चमकदार दिसेल.

Urea in skincare: Uses, benefits, risks, and more

- Advertisement -

1. त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा

जेव्हाही तुम्ही रात्री झोपायला जाता तेव्हा प्रथम तुमची त्वचा फेसवॉशने पूर्णपणे स्वच्छ करा. कारण फेसवॉशने चेहरा चांगला स्वच्छ होतो. तसेच फेसवॉशने चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि चेहऱ्यावर कोणत्या प्रकारची केमिकल रिऍक्शन होत नाही. तसेच यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉश घ्या आणि त्याने तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही.

2. झोपण्यापूर्वी टोनर लावा

तुम्हाला चमकणारी त्वचा हवी असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर टोनर लावा. यासाठी तुम्ही होम मेड टोनर वापरू शकता. यामुळे तुमची त्वचा छान दिसेल. यासोबतच तुम्ही रात्री झोपताना चेहऱ्याला टी ट्री ऑइलचे टोनर, एलोवेरा जेल आणि गुलाब वॉटर या गोष्टी तुम्ही टोनर म्हणून वापरू शकता. याशिवाय, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही फक्त गुलाबपाणी देखील लावून तुमची त्वचा चमकदार बनवू शकता.

- Advertisement -

3. नाईट क्रीम वापरा

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची त्वचा चमकदार आणि हायड्रेट ठेवायची असेल, तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी नाईट क्रीम लावा. यामुळे त्वचेला आराम मिळतो आणि ती दिवसभर चमकदार दिसते. तसेच तुमच्या त्वचेच्या स्किन टोननुसार तुम्हाला बाजारात अनेक क्रीमचे पर्याय मिळतील. ज्याचा तुम्ही रोज वापर करू शकता. अशातच तुम्ही खोबरेल तेल, शिया बटर किंवा तूप वापरून घरी नाईट क्रीम बनवू शकता. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि दिसायलाही चांगली दिसते.


हेही वाचा : थंडीत चेहरा, केस आणि पायांची अशी ‘घ्या’ काळजी

- Advertisment -

Manini