Wednesday, April 24, 2024
घरमानिनीBeautyBeauty : तुमच्या चेहऱ्याचा आकार सांगते तुमची personality

Beauty : तुमच्या चेहऱ्याचा आकार सांगते तुमची personality

Subscribe

आपला प्रत्येकाचा चेहरा नेहमी काय तरी सांगत असतो. चेहऱ्याचा रंग कोणता ही असो परंतु चेहरा हा नेहमी बोलका असतो. अनेकदा आपण ऐकले असेल की जिभेने काही बोला किंवा न बोला, पण चेहरा तुमचे सर्व रहस्य उघड करतो. आणि होय, हे अगदी खरे आहे की तुमचा चेहरा तुमची सर्व रहस्ये उघड करतो. फेस रीडिंग तज्ज्ञ जीन हॅनर यांच्या मते, तुमच्या चेहऱ्याचा आकार तुमच्या व्यक्तिमत्त्वाची आणि आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन याबद्दल माहिती देतो.

What Is My Face Shape? 3 Steps to Finding Your Face Shape | Allure

- Advertisement -

व्यक्तिमत्व चाचणी ही तुमच्या आवडी-निवडी, बुद्धिमत्ता आणि विचार इत्यादींचे रहस्य उघड करण्यासाठी एक सुपर साधन मानले जाते. तसेच व्यक्तिमत्व चाचण्या बनावट कथांच्या आधारे केल्या जात नाहीत, तर त्यांना वैज्ञानिक आधार सिद्ध केल्या जात आहेत. ज्याद्वारे मनुष्याची मानसिक स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

चला तर मग जाणून घेऊया,चेहऱ्याच्या आकारानुसार कोणाचा स्वभाव कसा असतो.

- Advertisement -

1. गोल आकाराचा चेहरा-

जर तुमचा चेहरा गोल असेल तर तुम्ही दयाळू आणि उदार आहात. अशातच तुम्ही नेहमी इतरांना स्वतःच्या वर ठेवता. मैत्री आणि नातेसंबंधांमुळे अनेकदा तुम्ही स्वतःला विसरता. निश्‍चितच तुम्ही ती व्यक्ती आहात जिला इतरांच्या उपयोगी पडण्यात आनंद मिळतो. या चेहऱ्याच्या व्यक्ती या मृदुभाषी असतात.
तुमच्या व्यक्तिमत्त्वाची एक मनोरंजक गोष्ट म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरून तुमचे वय ठरवणे कठीण असते, ते म्हणजे तुम्ही अनेकदा तुमच्या वयापेक्षा लहान दिसता.

Round face shape | HOWTOWEAR Fashion

2. हृदयाच्या आकाराचा चेहरा-

तुमचा चेहरा हृदयाच्या आकाराचा असल्यास, तुमच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये सांगतात की तुम्ही एक सर्जनशील आणि मजबूत डोक्याचे व्यक्ती आहात. तुमची मानसिकता खूप मजबूत असली तरीही तुम्ही खूप दयाळू आहात. अशातच तुमचे मजबूत मन कधी कधी तुम्हाला हट्टी बनवते. महत्वाचे म्हणजे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीशी तडजोड करायला आवडत नाही. एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळवायचीच असेल तर तुम्ही ती मनात ठरवतात. हृदय आकाराच्या चेहरेपट्टी असलेल्या लोकांची भावनिक बुद्धिमत्ता उच्च असते.

Heart face shape | HOWTOWEAR Fashion

3.ओव्हल चेहरा आकार-

ओव्हल चेहऱ्याच्या लोकांकडे समतोल राखण्याचा विशेष गुण असतात. या चेहऱ्याची मंडळी लगेच मिक्स होत नाहीत. तसेच या व्यक्तींना बर्‍याचदा अनेक गोष्टींवर तटस्थ राहायला आवडते आणि त्यांना त्याचे स्वतःचे मत मांडायला आवडते. अशातच या व्यक्तींना “कुछ तो लोग कहेंगे” सारख्या गोष्टींमध्ये अजिबात रस नसतो. तसेच या व्यक्ती सामाजिकदृष्ट्या मिक्सअप होत नसल्या तरीही यांना बाहेर फिरायला आवडते.

Oval face shape | HOWTOWEAR Fashion

4.चौरस चेहरा आकार-

जर तुमच्या चेहऱ्याचा आकार चौरस असेल, तर तुमचे व्यक्तिमत्त्व हे दर्शविते की तुम्ही खूप उत्साही आहात. तसेच या चेहऱ्याच्या लोकांना तणावपूर्ण वातावरणात शांतपणे कसे काम करावे हे माहित असत. त्यामुळे अशा चेहऱ्याची लोक जनतेचा विश्वास जिंकण्यात यशस्वी असतात. या व्यक्तींना कामात नियमितता आवडते. अशातच या व्यक्तीचे निर्णय चुकीचे नसतात. यासोबतच या व्यक्तींकडे निर्णय घेण्याची शक्ती खूप मजबूत असते.

The 13 Best Hairstyles for Square Faces

 


हेही वाचा : Beauty : सुंदर दिसण्यासाठी क्रिम पावडरच्या मागे धावू नका, तर करा ‘या’ पदार्थाचे सेवन

- Advertisment -

Manini