ऋतू कोणताही असो, त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण वेळोवेळी त्वचेची काळजी नीट घेतल्यास त्वचा चमकदार आणि नितळ दिसते. आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपण नेहमी त्वचेसाठी खास काही करत नसतो. अशातच तुम्ही स्वयंपाकघरात असलेल्या वस्तू त्वचेवर वापरू शकता. यामुळे त्वचेला कोणतीही समस्या उद्भवणार नाही आणि तुमचे पैसेही जास्त खर्च होणार नाहीत.
1. मऊ त्वचेसाठी दही सर्वोत्तम
दह्याचा वापर अनेकदा जेवणात केला जातो. त्यात असलेले बॅक्टेरिया आणि अँटीऑक्सिडंट हे गुणधर्म त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. तसेच दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड आणि अल्फा हायड्रॉक्सी देखील भरपूर असते. यामुळे त्वचा मुलायम राहते.
– अशाप्रकारे दही चेहऱ्याला लावा
- यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात 2 चमचे दही घ्या.
- आता त्यात बेसन मिक्स करा.
- तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात कोरफडही टाकू शकता.
- नंतर हे मिश्रण चांगले मिसळा.
- यानंतर ते चेहऱ्यावर लावा.
- हा फेसपॅक 30 मिनिटे कोरडा होऊ द्या. त्यानंतर पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.
- तुम्ही हे आठवड्यातून एकदा तुमच्या चेहऱ्यावर वापरू शकता आणि त्वचा मऊ करू शकता.
2. चेहऱ्यावर मध लावा
मध त्वचेसाठी खूप चांगले असते. यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म त्वचा स्वच्छ करतात आणि टॅनिंग दूर करतात. तसेच त्वचा मुलायम राहते. त्यामुळे तुम्ही आठवड्यांतून दोनदा तरी चेहऱ्याला मध लावा.
– अशा प्रकारे चेहऱ्यावर मध वापरा
- यासाठी एका भांड्यात 2 चमचे मध घ्या.नंतर चेहऱ्यावर लावा.
- आता 15-20 मिनिटे चेहऱ्यावर मध तसेच राहू द्या.
- यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
- यामुळे तुमची त्वचा मॉइश्चरायझेशन राहील आणि त्वचा मऊ होईल.