Thursday, April 18, 2024
घरमानिनीBeautyहातांवरील मेहेंदी रंगण्यासाठी टिप्स

हातांवरील मेहेंदी रंगण्यासाठी टिप्स

Subscribe

महिला कितीही फॅशनेबल आणि आधुनिक झाल्या तरी मेहंदी लावण्याच्या मोह महिलांकडून आवरला जात नाही. त्यात आता लग्न सराईचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे तुमच्यापैकी अनेक जणीही मेहेंदी काढणार असतील. प्रत्येकीलाच आपल्या हातावरील मेहेंदी ही गडद रंगाची असावी असे वाटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यासंदर्भातील काही टिप्स सांगणार आहोत.

- Advertisement -

मेहेंदी लावण्यापूर्वी या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा –

1)मेहेंदी मिक्स केल्यावर ती कधीही हातावर लगेचच लावू नये. असे केल्यास मेहेंदीला रंग चढत नाही. केव्हाही मेहेंदी वापरण्यापूर्वी ती ५ ते ६ तास भिजत ठेवा आणि त्यानंतरच ती वापरा.

- Advertisement -

2)मेहेंदी लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या.

3) मेहेंदी लावण्यापूर्वी हाताला अवश्य निलगिरीचे तेल लावा.

मेहेंदी मिक्स करताना ‘या’ गोष्टी अवश्य लक्षात ठेवा –

मार्केटमध्ये ऑरगॅनिक आणि केमिकलबेस अशा दोन प्रकारच्या मेहेंदी मिळतात. त्यामुळे मेहेंदी निवडताना योग्य काळजी घ्या.

चहा किंवा कॉफीच्या पाण्यात मेहेंदी मिसळा आणि त्यात निलगिरीचे तेल टाका. हे मिश्रण तुम्ही लोखंडी कढईत ५ तास झाकून ठेवा आणि त्यानंतर वापरा.

मेहेंदीचा रंग गडद करण्यासाठी काय कराल? –

२ तास मेहेंदी हातावर ठेऊन ती तुम्ही काढू शकता. यानंतर तज्ज्ञांच्या खालील टिप्स फॉलो करा.

-लोखंडी तव्यावर ४ लवंगा ठेऊन तवा गरम करून घ्या. तव्याच्या वाफेवर २ ते ३ मिनिटे हात शेकवून घ्या. अशाने मेहेंदीचा रंग गडद होईल.

-जर तुमच्या हातांची त्वचा ड्राय असेल तर अशावेळी तुम्ही लिंबू आणि साखरेचे पाणी हातांवर लावू शकता.

-देशी तूप गरम करून तुम्हीच हाताला चोळू शकता. असे केल्याने मेहेंदी रंगते.

-तुम्ही हातांना बामही लावू शकता. बाम हाताला लावल्यानंतर हात चांगले घासून घ्या. हे केल्याने सुद्धा मेहेंदीचा रंग गडद होतो.

-हातांवर २ थेंब निलगिरीचे तुम्ही लावू शकता. त्यानंतर तासाभराने हात स्वच्छ धुवून घ्या. असे केल्याने मेहंदीचा रंग जास्त प्रमाणात गडद व्हायला मदत मिळते.

 

 

 

 

 

 


हेही वाचा ; घरच्या घरी सोप्या पद्धतीने करा फेस क्लिनअप

 

- Advertisment -

Manini