आपल्या त्वचेचा ग्लो कायम राहावा,अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. पण बदलत्या हवामान आणि अनेक कारणामुळे तुमच्या त्वचेचा ग्लो निघून जातोय. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेवर अनेक उपचार करत असला. पण हे उपचार जास्त खर्चिक आहे का? आणि तुमचा हा खर्च कमी करण्यासाठी तुम्ही घरीच फुलांचा फेस पॅक तयार करू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा ताजीतवाने तर होईलच. त्यासबोत तुमच्या त्वचेच्या ग्लो परत येईल. हा फेस पॅक तुम्ही घरगुती पद्धतीने कसा तयार करू शकता आणि त्वचेवर कसा लावावा. यासंदर्भात आज तुम्हाला माहिती देणार आहोत.
जास्वंद फुलांचा फेस पॅक
जास्वंदचे फूल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. त्यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह सारखे पोषक घटक आढळतात जे त्वचेला पोषण देण्याचे काम करते. याशिवाय, जास्वंद फूलामध्ये व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे जो त्वचेला रिपेअर करण्यास मदत करतो.
साहित्य
- जास्वंद फ्लॉवर – 4-5
- ओट्स पावडर – 2 टेस्पून
- टी ट्री तेल – 2-3 थेंब
असा बनवा
- यासाठी सर्वप्रथम जास्वंदचे फुले रात्रभर थंड पाण्यात भिजवून ठेवा.
- त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते बारीक करून घ्या.
- आता एक वाटीत घ्या आणि यात जास्वंदाची फुले, ओट्स पावडर आणि टी ट्री ऑइल घ्यावे.
- यानंतर, हे मिश्रण चांगले एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा.
असा लवा फेस पॅक
- फेस पॅक त्वचेवर लावण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करून घ्या.
- त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.
- आता ३० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा.
- यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
- या फेस पॅकचा वापर केल्याने त्वचा स्वच्छ होईल आणि त्वचेच्या सर्व समस्याही कमी होतील.
झेंडूचा फुलांचा फेस पॅक
झेंडूच्या फुलामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे त्वचेवरील टॅनिंग आणि पिंपल्ससारख्या समस्या कमी होतात. म्हणूनच तुम्ही तत्वेवर फेस पॅक लावा.
साहित्य
- झेंडूची फुले – 2-3
- दही – २ चमचे
- चंदन पावडर – 1 टी स्पून
असा बनवा फेस पॅक
- सर्वप्रथम झेंडूचे फूल कोमट पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.
- सकाळी उठल्यावर मिक्सरमध्ये झेंडूची फुले बारीक करून घ्या.
- आता त्यात दही आणि चंदन पावडर मिक्स करा.
- सर्व साहित्य टाकल्यानंतर या मिश्रणाची पेस्ट तयार करा.
असा लावा फेस पॅक
- सर्व प्रथम एक वाटी घ्या आणि त्यात सर्व मिश्रण टाका.
- यानंतर चेहरा स्वच्छ करा आणि हा पॅक चेहऱ्यावर लावा.
- सुमारे 20 मिनिटे चेहऱ्यावर फेस पॅक राहू द्या.
- त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
- या फेस पॅकमुळे तुमच्या त्वचेची चमक परत येईल. तसेच पावसाळ्यात तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर ते कमी होतील.
- तेलकट त्वचा असलेल्या लोकांसाठी हा फेस पॅक खूप चांगला आहे.
‘या’ गोष्टींची काळजी घ्या
- जेव्हा तुम्ही त्वचेवर फेस पॅक लावाल तेव्हा तो ताजा तयार करावा.
- घरी बनवलेले फेस पॅक जास्त काळ ठेवू नका.
- त्वचेचा टाइप लक्षात घेऊन फेसपॅक वापरा.
टीप – वरील दिलेला फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर लावण्यापूर्वी तुम्ही तत्वचेवर पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते.