Friday, April 19, 2024
घरमानिनीBeautytravel makeup kit : प्रवासात ही सौंदर्य प्रसाधने बाळगायला विसरु नका...

travel makeup kit : प्रवासात ही सौंदर्य प्रसाधने बाळगायला विसरु नका…

Subscribe

प्रत्येकासाठी प्रवास हा कितीही रोमांचक असला तरी आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी मात्र हा प्रवास अनेकदा विपरीत परिणाम करणारा ठरतो. कारण प्रवासादरम्यान आपले दैनंदिन स्किन केअर रुटीन पाळता येणे शक्य नसते. बदलणारे वातावरणही त्वचेवर परिणाम करू शकते.

तुम्हाला तुमचा संपुर्ण ब्युटी किट घेऊन जाण्याचा जरी मोह होत असला तरी ते सर्व घेऊन जाणे शक्य नाही. त्यामुळे प्रवासात योग्य सौंदर्य उत्पादने कशी निवडाल याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

- Advertisement -

16 Best Makeup Bags and Cosmetic Case Travel Organizers of 2023

 

- Advertisement -

अल्कोहोल फ्री क्लिंझरचा वापर करणे-

अगदी घाईत असताना कमीत कमी वेळेत योग्य प्रकारे मेकअप काढून टाकतात.

योग्य सनस्क्रीन वापरणे –

तुम्ही थंड ठिकाणी जात असाल किंवा समुद्रकिनाऱ्यावर फिरणार असाल तर सनस्क्रीन आवश्यक आहे. यामुळे तुमच्या त्वचेचे योग्य संरक्षण होते.

मॉइश्चरायझर लावा –

त्वचेला नियमित पोषण मिळणे आवश्यक आहे आणि हे काम मॉइश्चरायझर करते. मॉइश्चरायझर तुमची त्वचा कोरडे होण्यापासून रोखेल. तेलकट त्वचेसाठी वॅाटर बेस मॉइश्चरायझर निवडा आणि कोरड्या त्वचेसाठी ॲाईल बेस मॉइश्चरायझर निवडणे योग्य राहिल.

मेकअप रीमूव्हर वाइप्स-

ते डिस्पोजेबल असतात आणि जास्त जागा देखील व्यापत नाहीत. रात्रीच्या वेळेस यांचा वापर करणे सोयीस्कर ठरते.

बॉडी लोशन-

केवळ तुमचा चेहराच नाही, प्रवासादरम्यान तुमचे शरीरही डिहायड्रेट होऊ शकते, त्याकरिता तुम्हाला तुमच्या ब्युटी किटमध्ये चांगल्या प्रतीच्या बॉडी लोशनची गरज आहे.

ड्राय शॅम्पू-

प्रवासादरम्यान नेहमीच केस धुणे शक्य नसते त्यासाठी ड्राय शैम्पू हा एक चांगला पर्याय ठरतो. यामुळे केसांना घामामुळे येणारा वास नाहिसा होईल.

फेस क्लीन्झर-

सकाळ आणि रात्रीच्या नित्यक्रमांमध्ये ही महत्त्वाची गोष्ट आहे. हे त्वचेवरील धूळ, मेकअप काढून टाकते आणि त्वचेवरील छिद्र स्वच्छ करते. सौम्य आणि हायड्रेटिंग अशा क्लीन्झरची निवड योग्य राहिल.

बीबी क्रीम-

प्रवासाचा अर्थ असा नाही की तुम्हाला पूर्णवेळ मेकअपशिवाय रहावं लागेल. बीबी क्रीम ही प्राइमर, मॉइश्चरायझर, फाउंडेशन, कन्सीलर म्हणून वापरली जाऊ शकते आणि त्यात काही सन शील्ड गुणधर्म देखील आहेत. ही मल्टीफंक्शनल ट्यूब तुमच्या किटमध्ये ठेवायला विसरू नका.

लिपस्टिक-

यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, ते ओठांना पोषण देतात आणि ओठांना एक रंगही देतात. तुम्ही एका सेटसोबत मिनिएचर लिपस्टिक देखील मिक्स आणि मॅच करू शकता.

लिप बाम-

हे ओठांना तडे जाण्यापासून रोखतात. तो तुमच्या किटमध्ये ठेवायला विसरु नका.

कॉम्पॅक्ट पावडर-

फाउंडेशन लावणे हे वेळखाऊ काम आहे. कॉम्पॅक्ट पावडर हा त्याला दुसरा सर्वोत्तम पर्याय आहे. ते सांडत नाही आणि योग्य फिनीशींग देते. तुम्ही फक्त पावडर चेहऱ्यावर लावली तरी एक फ्रेश लूक मिळवू शकता.

परफ्यूम-

चांगला सुंगध प्रत्येकालाच आकर्षित करतो. त्यामुळे तुमच्यासोबत परफ्यूम ठेवायसा विसरु नका. खासकरून जर तुमच्या प्रवासात खूप चालणे, शारीरीक क्रिया इत्यादींचा समावेश असेल तर तुम्ही प्रवासात लहान आकाराच्या परफ्यूमच्या बाटल्या तुमच्यासोबत ठेवा.

कन्सीलर स्टिक-

जर तुमचा प्रवास थकवणारा असेल तर तुमच्या प्रवासाच्या गरजांसाठी हायड्रेटिंग, मॅट फिनिश कन्सीलर सोबत बाळगा. हे काळी वर्तुळे आणि निस्तेज त्वचा लपवण्यास आणि त्वचा ताजीतवानी दिसण्यास मदत करू शकते.

शॅंम्पू आणि कंडिशनर-

केस खराब होण्यापासून टाळायचे असेल तर तुमच्या आवडत्या शॅम्पू आणि कंडिशनरच्या मिनी बाटल्या सोबत ठेवा.

काजळ/मस्करा-

तुम्ही या दोघांवर प्रयोग करू शकता आणि तुमच्या डोळ्यांना तुम्हाला हवा तसा लूक देऊ शकता. ते रेखीव डोळ्यांकरिता किंवा डोळे मोठे दिसण्यासाठी वापरता येतात.

तुम्‍ही त्वचेच्‍या तीव्र आजाराने त्रस्‍त असल्‍यास त्वचारोग तज्ज्ञांनी शिफारस केलेली त्वचा उत्‍पादने देखील सोबत न्यायला विसरू नका. जर तुम्हाला ब्रेकआउट्स किंवा त्वचा आणि केसांच्या इतर समस्यांबद्दल काळजी वाटते तर वर दिलेल्या यादीतील वस्तू न्यायला विसरु नका.


हेही वाचा :  Nails Care : नखांच्या आरोग्यासाठी ‘या’ 5 पदार्थांचा आहारात करा समावेश

- Advertisment -

Manini