Thursday, February 22, 2024
घरमानिनीBeautyडार्क सर्कलसाठी हळद बेस्ट

डार्क सर्कलसाठी हळद बेस्ट

Subscribe

अनेक महिलांना डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या प्रामुख्याने जाणवते. अशावेळी ही समस्या दूर करण्यासाठी रोजच्या स्वयंपाक घरात वापरली जाणारी हळद फायदेशीर आहे. पदार्थ बनवताना वापरली जाणारी हळद अनेक प्रकारे त्वचेसाठी फायदेशीर आहे. हळदीच्या वापराने त्वचेचा हरवलेला ग्लो पुन्हा मिळवता येतो तसेच त्वचेची संबंधित समस्याही दूर होऊ शकतात. जाणून घेऊयात, डार्क सर्कल दूर करण्यासाठी हळद कशी वापरायची.

- Advertisement -

हळद, बेसन आणि टोमॅटोचा रस –
डार्क सर्कल कमी करण्यासाठी कच्ची हळद बारीक करून त्यात बेसन आणि टोमॅटोचा रस मिक्स करून तुम्हाला डोळ्यांखाली लावायचा आहे. 10 ते 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. असे केल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहील आणि डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी होऊ शकतात.

भिजवलेली मसूर, हळद आणि लिंबाचा रस –
लाल मसूर रात्रभर भिजवून त्याची पेस्ट बनवून घ्या. त्यात कच्ची हळद आणि लिंबाचा रस मिक्स करून घ्या. तयार झालेली घट्ट पेस्ट डोळ्यांखाली लावून घ्या. काही वेळाने डोळे स्वच्छ धुवून घ्या. तुम्हाला फरक जाणवेल.

- Advertisement -

दूध, मध आणि हळद –
दुधात अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्या. तयार झालेली पेस्ट डोळ्यांखाली लावून घ्या. याने त्वचेचा रंग उजळायला मदत होईल.

दही, कोरफड जेल आणि हळद –
दहयात हळद आणि कोरफडीचे जेल मिक्स करून डोळ्यांखाली लावा. हे मिश्रण 3 ते 4 मिनिटे डोळ्यांखाली लावून स्वच्छ धुवून घ्या. याने त्वचेतील मृत पेशी निघून जातील आणि डार्क सर्कल कमी होण्यास मदत मिळेल.

 

 


हेही वाचा ;  सुंदर त्वचेसाठी चेहऱ्यावर लावा राईस फेसपॅक

- Advertisment -

Manini