Sunday, February 25, 2024
घरमानिनीBeautyचेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी वापरा दही

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी वापरा दही

Subscribe

वाढत्या वयासोबत तत्वचेची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे असते. वयाच्या 30 नंतर तुमच्या तत्वेमध्ये मोठे बदल होऊ लागतात. तुमचा चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर सुरकुत्या घालवण्यासाठी बाजार अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. पण या प्रोडक्टमध्ये केमिकल असल्यामुळे तुमच्या चेहऱ्याला फायदा पोहोचवण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

दरम्यान,  वाढत्या त्वचेच्या समस्येवर तुम्ही काही घरगुती उपायांचा नक्की विचार करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्याला कोणतेही नुकसान होत नाही उलट फायदा होईल, असे एक्सपर्ट सांगतात. तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही कोणते घरगुती फेस पॅक लावा जेणे करून तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जातील. यासाठी तुम्ही दह्याचा फेस पॅक तयार करून चेहऱ्यावर लावावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.

- Advertisement -

दह्याचे फायदे

त्वचेवर चमक आणण्यासाठी दही फायदेशीर आहे. दही हे त्वचेवर दिसून येणारे एजिंग साइस कमी करण्यास काम करते. दह्याच्या वापराने तुमचा चेहराहा दीर्घकाळ तरुण आणि सुंदर दिसतो.

 मधाचे फायदे

चेहऱ्याला नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट करण्यासाठी मध हा एक उत्तम पर्याय मानला जातो. मधामुळे तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र स्वच्छ होतात आणि चेहऱ्याची त्वचा मऊ होण्यास होते. मध हे तुमच्या त्वचेला मॉइस्चराइझ देखील करते

- Advertisement -

असा तयार करा फेस पॅक 

  • चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी प्रथम एका भांड्यात 2 ते 4 चमचे दही घ्या.
  • त्यात २ चमचे मध घालून ते एकत्र करून घ्या.
  • दही आणि मध एकत्र केल्यानंतर ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर लावा.
  • हा फेसपॅक चेहऱ्यावर 20 मिनिटे राहू द्या.
  • यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
  • हा घरगुती उपाय तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता.
  • याचा सतत वापर केल्याने तुम्हाला त्वचेत बदल दिसू लागतील.

टीप – घरगुती फेस पॅक चेहऱ्यावर लावताना पॅच टेस्ट करून बघा. चेहऱ्यावर कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुम्ही एक्सपर्टचा देखील सल्ला घेऊ शकता.

- Advertisment -

Manini