आपल्याला प्रत्येकाला छान,सुंदर आणि तरतरीत दिसायला आवडतं. चेहऱ्याचे सौंदर्य हे आजकाल प्रत्येकाला हवे हवे वाटणारे आहे. जर का तुमची त्वचा निस्तेज असेल किंवा काळवंडलेली असेल तर दर पंधरा दिवसांनी तुम्हाला फेशियलची खरच गरज आहे. तसेच १५ दिवसांतून एकदा फेशियल केल्याने त्वचा स्वच्छ राहण्यास खूप मदत होते. हे केल्याने चेहऱ्याची छिद्र स्वच्छ करण्यासोबतच डेड स्किन सुद्धा निघून जाते.
तसेच चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स देखील दूर होतात. अशातच फेशियल केल्याने चेहऱ्याची त्वचा खराब होत नाही. साधारणपणे स्त्रिया महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा फेशियल करून घेतात. मात्र, महिन्यातून दोनदा म्हणजेच १५ दिवसांतून एकदा फेशियल केले तर त्वचेला त्याचा अधिक फायदा होता. अशातच आता आपण जाणून घेऊया याचा त्वचेला कसा फायदा मिळतो.
- फेशियल ही एक स्किनकेअर ट्रीटमेंट आहे.
- या ट्रीटमेंटला जास्तीत जास्त अर्धा तास किंवा एक तास लागतो.
- तसेच फेशियल करताना फायदे वेगवेगळ्या स्किन प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो.
- फेशियल करताना डेड स्किन काढून टाकली जाते. आणि त्वचेला आराम मिळतो.
- हे करताना चेहऱ्याला आराम तर मिळतोच आणि चेहऱ्याची त्वचा हायड्रेड राहते.
- फेशियल करताना जो मसाज केला जातो त्यामुळे चेहऱ्याचे पॉर्स सुधारता. तसेच ब्लड सर्क्युलेशन सुद्धा चांगल्या प्रकारे होते.
- जर का तुमचे वय जास्त असेल आणि तुम्हाला ते नको असेल तर फेशियलमुळे तुमची चेहऱ्याची स्किन टाईट होऊ शकते.
- आणि या टाईट तसेच हेल्दी स्किनमुळे तुम्ही म्हातारे किंवा जास्त वयाचे वाटणार नाही.
- अशातच फेशियल प्रॉडक्ट्स तुम्ही घरी आणून सुद्धा घरच्या घरी हे फेशियल अगदी सोप्या पद्धतीने देखील करू शकता.
- सगळ्यात महत्वाचे म्हणजे संवेदनशील त्वचेच्या लोकांना काळजीपूर्वक फेशियल करण्याचा सल्ला नेहमी दिला जातो.
- कारण अशा त्वचेवर खूप लवकर जळजळ होते, ज्यामुळे स्किनच्या अनेक समस्या उध्दभवू शकतात.
हेही वाचा : साबणाने चेहरा धुत असाल तर आधी हे वाचा