Sunday, February 25, 2024
घरमानिनीBeautyUnderarms Dryness कमी करण्यासाठी तुम्ही 'या' घरगुती उपाय नक्की ट्राय करा

Underarms Dryness कमी करण्यासाठी तुम्ही ‘या’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा

Subscribe

तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या तत्वसाठी अनेक प्रॉडक्ट वापरता. यासाठी अनेकदा पार्लरला देखील जाता आणि महागड्या ट्रीटमेंट देखील करता. पण, तुम्हाला तुमच्या अंडरआर्म्सकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. जेव्हा तुमच्या अंडरआर्म्सचे केस वाढतात. तेव्हा तुम्ही पार्लरला जाऊन वॅक्सिंग किंवा रेझरने केस काढता. पण, यामुळे काही महिलांच्या अंडरआर्म्स कोरडे होतात. अंडरआर्म्सचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या अंडरआर्म्सचा कोरडेपणा कमी करू शकता.

खोबरेल तेल

- Advertisement -

खोबरेल तेल हे तुमच्या त्वचेसाठी खूप गुणकारी मानले जाते. खोबरेल तेलात मिनरल आणि व्हिटामिनचे प्रमाण जास्त आहेत. यामुळे तुमची त्वचा मऊ होते म्हणून तुम्ही तुमच्या अंडरआर्म्सवर खोबरेल तेल लावावे. हा उपाय तुम्ही रात्री झोपाण्यापूर्वी करावा. यासाठी तुम्ही तुमच्या अंडरआर्म्सला स्वच्छ करून घ्या. यानंतर खोबरेल तेल लावा आणि रात्रभर तसेच राहू द्यावे. यानंतर सकाळी उठल्यावर आंघोळ करून घ्यावी. यानंतर तुम्ही बघा तुमचे अंडरआर्म्सची त्वचा मऊ झालेली असेल.

चंदन पावडर

- Advertisement -

काही महिलांच्या अंडरआर्म्सवर पुरळ आणि कोरडेपणा असेल, तर ते जाण्यासाठी तुम्ही चंदन पावडरचा वापर करू शकता. यामुळे तुमची अंडरआर्म्स मऊ आणि काळपटपणा देखील कमी करण्यास मदत करतो. यासाठी तुम्ही एका वाटीत तुमच्या गरजेनुसार चंदन पावड घ्या आणि पाणी टाकून मिक्स करू घ्यावी. आता ही पेस्ट तुमच्या अंडरआर्म्सवर लावा आणि 20-25 मिनिटे ठेवा. यानंतर कपड्याच्या मदतीने स्वच्छ करून घ्या. अंडरआर्म्सवर चंदन पावडर ही आठवड्यातून 2 वेळा लावावी. यामुळे तुमचे अंडरआर्म्सची त्वचा मऊ होईल.

मध

मधामध्ये एंटी बॅक्टेरियाल गुणधर्म आहेत. यामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन (मृत त्वचा) घालवण्याचे काम करते. यासाठी तुम्हाला मध घ्या आणि गुलाब जल मिक्स करा. हे तुम्ही तुमच्या अंडरआर्म्सवर लावून 20 मिनिट ठेवा. यानंतर कोमट पाण्यानी स्वच्छ करून घ्या. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 वेळा करावा. यामुळे तुमचे अंडरआर्म्स मऊ होतील.

‘या’ गोष्टी करणे टाळा

  • अंडरआर्म्सवर जास्त वॅक्सिंग आणि रेझरचा वापर करू नका. यामुळेच तुमचे अंडरआर्म्स कोरडेपणा येतो.
  • कोणताही प्रॉडक्ट अंडरआर्म्सवर लावण्यापूर्वी त्याची चाचणी करावी.

हेही वाचा – चेहरा चमकदार आणि सुंदर दिसण्यासाठी वापरा हा Strawberry Scrub

- Advertisment -

Manini