आपण अनेकदा चेहऱ्याला खूप काही वेगवेगळे पदार्थ लावतो. त्यामुळे चेहरा तात्पुरता चांगला वाटतो. पण जर का तुम्ही बाहेरचे जास्त कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वापरले तर चेहऱ्याला त्याचा त्रास होऊ शकतो. अशातच जर का तुम्ही चेहरा स्वच्छ आणि तजेलदार ठेवण्याचा प्रयत्न करत असला तर दह्याचा फेसपॅक तुमच्यासाठी अतिशय फायदेमंद आहे. चांगले बॅक्टेरिया आणि लॅक्टिक अॅसिडने समृद्ध असलेले दही काळी त्वचा आणि सनबर्न सारख्या समस्या टाळतात. जाणून घ्या काही सोपे दही फेस पॅक ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि निरोगी राहील.
दह्यापासून सोपे फेस पॅक असे तयार करा
1. दही आणि मध फेस पॅक
मध त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी आणि चेहरा आणि मानेच्या त्वचेवरील काळेपणा दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. दोन चमचे दह्यात १ चमचा मध मिसळून चेहऱ्याला लावा. 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा. यामुळे त्वचा स्वच्छ राहते आणि त्वचेची लवचिकताही कायम राहते.
2. दही आणि बेसन
त्वचा तजेलदार होण्यासाठी बेसनाचे पीठ दह्यात मिसळून लावल्याने लगेच फायदा मिळतो. यासाठी दोन चमचे दह्यात एक चमचा बेसन मिसळून त्यात काही थेंब गुलाबपाणी टाका. हे मिश्रण मानेच्या मागच्या बाजूला आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेवरील छिद्रांची समस्या दूर होऊ लागते.
3. दही आणि ओट्स
त्वचा मॉइश्चराइज ठेवण्यासाठी दही आणि ओट्स मिक्स करून चेहऱ्याला लावा. यासाठी २ चमचे दह्यात १ चमचा ओट्स पावडर मिसळा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावून कोरडे राहू द्या. यामुळे त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल आणि डेड स्किन निघून जाईल.
4. दही आणि हळद
हळदीमध्ये असेलेले अँटीबॅक्टरीयाचे अनेक चांगले गुण हळदीमध्ये असतात. तसेच हळदी आणि दह्याचे मिश्रण चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्याला नवी चमक येते. यासाठी १ चमचा दह्यात १ चिमूट हळद मिसळून संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावर दिसणार्या पिग्मेंटेशनपासूनही आराम मिळू शकतो. त्वचेवर वारंवार पिंपल्स येण्याची समस्या यामुळे देखील दूर होऊ लागते.
दह्याच्या फेसपॅकचे असे आहेत फायदे जाणून घ्या…
- दह्याच्या फेसपॅकमुळे चेहरा चांगला एक्सफोलिएट होण्यास मदत होते.
- दह्यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म चेहऱ्यावरच्या पिंपल्सपासून लांब ठेवतात.
- सनबर्नचा त्रास असणाऱ्यांनी चेहऱ्यावर दही लावावे.
- हे तुमच्या त्वचेला रॅशेस, डलनेस, टॅनिंग आणि पिगमेंटेशनपासून वाचवते . यामध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेला आराम देतात.
- तसेच ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी दह्याचा फेसपॅकने चेहऱ्याला मसाज करा.
- त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन हे फेस पॅक लावा.
- रोज फेस पॅक लावल्याने चेहऱ्याचा कोरडेपणा वाढू शकतो. आठवड्यातून 2 ते 3 वेळाच हा फेसपॅक लावा.