महादेवाला बेल अतिशय प्रिय आहे. असे म्हणतात की, शिवलिंगावर मनोभावे बेलपत्र अर्पण केल्यास महादेवाची आपल्यावर विशेष कृपा राहते. याव्यतिरिक्त असेही म्हटले जाते की, देवी पार्वतीने स्वत: महादेवाची बेलाच्या पानांनी पूजा केली होती, म्हणूनच बेलाची पाने शिवाला अतिशय प्रिय आहेत. महादेवाची आपल्यावर विशेष कृपादृष्टी राहावी यासाठी सोमवारी महादेवाला आवर्जून बेलपत्र अर्पण करतात आणि मनोभावे पूजा करतात. पण, आपण बेलपत्र महादेवाला वाहताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. शास्त्रात बेलपत्र अर्पण करताना काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यामुळे जाणून घेऊयात, महादेवाला बेलपत्र अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात,
बेलपत्राचे नियम –
बेलपत्र अर्पण करताना केवळ अनामिका, अंगठा आणि मधले बोट वापरावे.
बेलपत्र अर्पण करताना ओम नम: शिवाय मंत्राचा जप करावा.
महादेवाला बेलपत्र अर्पण करताना त्यावर डाग नसावा किंवा कोमजलेले नसावे.
बेलपत्र उलटे करून शिवलिंगावर अर्पण करावे.
बेलपत्राचा गुळगुळीत भाग शिवलिंगाच्या आतील बाजूस ठेवावा.
बेलपत्र महादेवाला अर्पण करताना त्याची पाने कुठूनही फाटलेली नसतील याची काळजी घ्यावी.
महिन्याच्या अष्टमी, चतुर्दशी, अमावस्या, पूर्णिमा या दिवशी बेलपत्र तोडू नयेत. असे करणे अशुभ मानले जाते.
सोमवार महादेवाला प्रिय असतो. त्यामुळे या दिवशी बेलाची पाने तोडू नयेत. तुम्हाला महादेवाला सोमवारी बेलपत्र वाहायचे असेल तर एक दिवस आधी तुम्ही तोडू शकता.
बेलपत्र महदेवाला अर्पण करताना तीनच अर्पण करावीत कारण ही तीन पाने महादेवाचे तीन डोळे मानले जातात.
शास्त्रानुसार संध्याकाळनंतर बेलपत्रे तोडू नयेत.
बेलपत्र तोडण्यापूर्वी नमस्कार करावा किंवा महादेवाचे स्मरण करावे.
इच्छित फळ हवे असल्यास 11, 21, 51 किंवा 108 बेलाची पाने महादेवाला अर्पण करावीत.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde