केस लांबसडक, दाट आणि मुलायम असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे आरोग्यासह केसांच्या समस्या उद्भवत आहेत. खरं तर, यामागे प्रदुषण, अपुरे पोषण ही कारणे देखील आहेत. ज्यामुळे केसांमध्ये कोंडा, केसगळती, केस खराब होणे सुरू होते. अशा वेळी अनेकजण बाजारात मिळणारे हेअर प्रॉडक्ट वापरायला सुरूवात करतात. पण, तुम्ही कोणतेही केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरण्याऐवजी तूप वापरू शकता. केसांना तूप लावणे फायदेशीर ठरू शकते. तूपामध्ये असणारे ऍटी-बॅक्टेरियल आणि ऍटी – ऑक्सीडंट गुणधर्म केसांना पोषण देतात. त्यामुळे जाणून घेऊयात केसांना तूप लावण्याचे फायदे,
कोंडा होतो कमी –
केसांना तूप लावल्याने अनेक फायदे होतात. तूपातील मॉइश्चरायजिंग गुणधर्म केसातील कोंडा कमी करते. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा तूपाने केस धुवू शकता. ज्यामुळे केस निरोगी आणि चमकदार होतात.
केसांसाठी कंडीशनर –
तूपातील ऍटी-ऑक्सीडंट आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड केसांसाठी फायदेशीर ठरतात. तुम्हाला केसांना कंडीशनर लावायचे असेल तर तुपाहून अधिक योग्य काहीही नसेल. यावेळी केस धुवून झाल्यानंतर केसांना हलक्या हाताने मसाज करावा.
केसांच्या वाढीसाठी –
केसांची वाढ कमी झाली असेल तर केसांना तूपाने मालिश करणे फायद्याचे ठरेल. तूपातील पोषक घटक केस वाढीसाठी उपयुक्त ठरतात. केसांच्या वाढीसाठी तुम्ही आठवड्यातून एकदा तरी केसांना तूप लावायला हवे.
दूतोंडी केसांसाठी फायदेशीर –
तुम्हाला जर दूतोंडी केसांची समस्या असेल तर तूप लावणे फायदेशीर ठरेल. तूपामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. व्हिटॅमिन ई मुळे दूतोंडी केस सुधारतात आणि नवीन केस उगवतात.
स्कॅल्पसाठी फायदेशीर –
स्कॅल्पला तूपाने मसाज करताना तूप थोडं कोमट करून घ्यावे. कोमट तूप केसांना कमीत कमी 1 तास केसांना लावून ठेवायला हवे. तासाभरानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde