हिंदू पुराणात ओम जप करण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. शास्त्रातील सर्व मंत्राचा उच्चार ओमने सुरू होतो. पुराणकाळापासून आपले ऋषीमुनी कठोर तपस्या करण्यासाठी ओम मंत्राचा जप करतात. शास्त्रानुसार, ओमच्या उच्चारात पूर्ण विश्वाचे ज्ञान दडले आहे. ओम मंत्राचे चमत्कारीक फायदे आहोत, जाणून घेऊयात, ओम जपाने शरीरावर काय परिणाम होतो.
ओम जपाचे फायदे –
- ओम मंत्राचा जप केल्याने स्ट्रेस कमी होतो. खरं तर, ओम मंत्राचा जप केल्याने एंडोर्फिन सोडण्यात येते.
- शरीरात एंडोर्फिन सोडल्याने तुम्हाला फ्रेश वाटते. तसेच रिलॅक्स वाटते.
- ओम मंत्राचा जप केल्याने हार्मोन्स बॅलन्स होण्यास मदत होते.
- एकाग्रतेची समस्या असेल तर ओम मंत्राचा जप करणे फायद्याचे ठरेल.
- ओम मंत्राच्या जपाने मन स्थिर होण्यास मदत मिळते, ज्यामुळे कोणत्याही कामवर लक्ष केंद्रित करता येते.
- ओम मंत्राचा जप केल्याने पोटाच्या तक्रारी कमी होतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.
- ओम मंत्राच्या नियमित सरावाने रक्तदाब सुधारतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
- ओमच्या उच्चाराने मानसिक ताणतणाव कमी होतो.
- ओमच्या उच्चाराने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते.
- या मंत्राच्या जपाने स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मदत होते.
- रागासारख्या भावनेवर नियंत्रण मिळवायचे असेल तर ओम मंत्राचा जप करावा.
- ओम मंत्राच्या नियमित सरावाने सकारात्मक उर्जा निर्माण होते.
- ओम जपाने तुम्ही चिंतामुक्त होता.
- ओमचा जप केल्याने तुमच्यातील फोकस सुधारतो.
ओमचा उच्चार कसा कराल ?
- ओम मंत्राचा जप केरताना स्वच्छ आणि मोकळ्या वातावरणात करावा.
- मंत्राचा जप करताना सुखासन, पद्मासन, वज्रासनात तुम्ही बसू शकता.
- ओमचा जप 5, 7, 11 किंवा 21 वेळा करणे फायदेशीर मानले जाते.
हेही पाहा –