बदलत्या लाइफस्टाइलनुसार केसांच्या विविध तक्रारी बऱ्याच जणांना जाणवत आहेत. जसे की, केस गळती, केसांची वाढ खुंटणे अशा समस्या. त्यामुळे तुमच्या हेल्दी केसांसाठी हेअर केअर रूटीनमध्ये तुम्ही हेअर परफ्यूमचा वापर करायला हवा. हेअर परफ्यूममुळे केस चमकदार, मऊ होण्यास मदत होते. याशिवाय घामामुळे केसांना येणाऱ्या वासापासूनही सूटका मिळते. जाणून घेऊयात, केसांवर हेअर परफ्युम लावण्याचे फायदे,
दुर्गंधीपासून सुटका –
घामामुळे केसांना येणाऱ्या वासापासून सुटका होण्यासाठी तुम्ही हेअर परफ्यूमचा वापर करायला हवा. हेअर परफ्यूममुळे केस सुगंधित राहण्यासाठी मदत होते.
उन्हापासून संरक्षण –
सुर्याच्या अतिनील किरणांपासून केसांचे संरक्षण होण्यासाठी तुम्ही तुमच्या हेअर केअर रूटीनमध्ये हेअर परफ्यूमचा वापर करू शकता.
केसांची वाढ –
हेअर परफ्यूममुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. तसेच केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
केसांना पोषण –
हेअर परफ्यूममुळे केसांचे पोषण होते. तुम्ही केसांना शॅम्पू केल्यानंतर हेअर परफ्यूम लावू शकता. याने केसांमधील ओलावा टिकून राहील. ज्यामुळे केस वाढ मदत होते.
ड्राय केसांसाठी फायदेशीर –
केस जास्तच ड्राय झाले असतील तर तुम्ही हेअर परफ्यूमचा वापर करायला हवा. ड्राय केसांच्या समस्येवर हेअर परफ्यूम वापरणे रामबाण उपाय आहे.
हेही पाहा :
Edited By – Chaitali Shinde