Friday, December 6, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीReligiousShiv Puja : शिवलिंगावर जल अर्पण करताय? या गोष्टी लक्षात घ्या

Shiv Puja : शिवलिंगावर जल अर्पण करताय? या गोष्टी लक्षात घ्या

Subscribe

भोळ्या शंकराला प्रसन्न करणे सर्वात सोपे असल्याचे शास्त्रात सांगण्यात आले आहे. महादेव भक्तांवर सहजपणे प्रसन्न होतात, त्यामुळे त्यांना भोलेनाथ असे म्हटले जाते. आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे, त्याचप्रमाणे सोमवार शिवाला समर्पित असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अनेक शिवभक्त सोमवारी शिवलिंगाला आवर्जून जल अर्पण करतात. पण, शिवलिंगावर जल अर्पण करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

या गोष्टी लक्षात घ्या –

  • हिंदू मान्यतेनुसार, शिवलिंगावर पूर्व दिशेला तोंड करून जल अर्पण करू नये.
  • याशिवाय शिवलिंगावर नेहमी उत्तर दिशेकडे तोंड करून जल अर्पण करायला हवे.
  • शिवलिंगावर जल अर्पण करताना लहान धार करून अर्पण करावे. याशिवाय ओम नम: शिवाय चा जप करावा.
  • शिवलिंगाला जल अर्पण करताना तुमचे तोंड उत्तर किंवा पश्चिम दिशेला नसेल याची खात्री करावी.
  • उभे राहून शिवाला जल अर्पण करू नये.
  • तांब्याच्या भांड्यातून शिवलिंगाला जल अर्पण करावे.
  • ज्या भांड्यामध्ये लोखंडाचा वापर केला आहे, त्या भांड्यातून शिवलिंगाला जल अर्पण चुकूनही करू नये.
  • शिवलिंगावर सकाळी जल अर्पण करणे शुभ मानले जाते.
  • शास्त्रात संध्याकाळी शक्यतो शिवलिंगावर जल अर्पण करणे टाळावे असे सांगण्यात आले आहे.

शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे फायदे –

  • दररोज शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण केल्यास फलदायी मानले जाते.
  • रोज एक भांडे पाणी शिवलिंगाला अर्पण केल्याने मनातील इच्छा सर्व पूर्ण होतात, असे म्हटले जाते.
  • जल अर्पण केल्याने व्यक्तीच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात.
  • शिवलिंगाला जल अर्पण केल्याने घरात सुख-शांती नांदते.
  • शिवलिंगाला दररोज जल अर्पण केल्याने कामातील अडथळे दूर होऊन शिवाची कृपा तुमच्यावर राहते.
  • शिवलिंगाला रोज जल अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि पती- पत्नीचे नाते अधिक घट्ट होते.
  • शिवलिंगावर जल अर्पण केल्याने कुंडलीतील सर्व दोष दूर होतात, असे म्हटले जाते.
  • शिवलिंगावर मनोभावे जल अर्पण केल्याने मान – सन्मान वाढण्यास सुरूवात होते.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini