प्रेमाला वयाचे बंधन नसते असं म्हणतात. यामुळे कोणाचंही कोणावरही प्रेम जडू शकत.पण असे असले तरी वाढत्या वयाबरोबर अनुभवातून येणारा समंजसपणाही वयानुसार महत्वाचा असतो. यामुळे महिलांना वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांच विशेष आकर्षण असतं.
वयाने मोठे असलेले पुरुष नातेसंबंधात सिरीयस असतात.
समजूतदार असण्याबरोबरच कमिटमेंटला पक्के असतात.
अनुभवामुळे त्यांना परिस्थिती हाताळण्याचे तंत्र अवगत असते.
यामुळे महिलेला त्याच्याबरोबरचे नाते अधिक सुरक्षित वाटते.
आपल्याकडेही लग्नावेळी नवरा मुलगा नवरीपेक्षा वयाने मोठा असल्याला प्राधान्य दिले जाते. त्यामागचे कारणही हेच आहे.
वयाने मोठा असलेल्या पुरुषाला जगरहाटीचा अनुभव असतो.
त्यामुळे तो पार्टनरला अडचणीत सहज मदत करतो.
रोमान्सच्याबाबतीतही असे पुरुष समजूतदार असल्याने महिला त्यांच्याशी भावनिकरित्या लवकर गुंतता.
त्यामुळे हे नाते अधिक काळ टिकते.
बॉलीवूडमध्ये सध्या अशाच नात्यांचा ट्रेंड आहे.
करीना-सैफ, मुग्धा गोडसे-राहुल देव, मिलिंद सोमन-अनित कोणवार असे अनेक जो़डपे आनंदात जीवन जगत आहेत.